Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Speech : लोकसभा निवडणूक केव्हा होणार? उद्धव ठाकरेंनी दिली हिंट

Vishal Gangurde

Uddhav Thackeray News:

आगामी लोकसभा निवडणुकीचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. काही राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून जागावाटपावरून चर्चा सुरु झाल्या आहेत. याचदरम्यान उद्धव ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीवर मोठं भाष्य केलं आहे. 'राम नवमीच्या आधी लोकसभा निवडणूक लावतात, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीची हिंट दिली आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित केले. या सभेत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.

'महसूल मिळण्याची सर्व ठिकाण तुम्ही ओरबडून घेऊन जात आहेत. महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालताय. नार्वेकरांना सांगा इकडे या आणि सांग शिवसेना कुणाची आहे? बंद दाराआड निर्णय देतात? मी पक्षप्रमुख नाही असे म्हणणारे तेव्हा दाढी खाजवत बसले होते. तेव्हा नार्वेकर बिल्ला लावून उभे होते. २०१४ साली भाजपने युती तोडली. त्यावेळी आपण ६३ जागा जिंकल्या. त्यावेळी पांढऱ्या दाढीवाली व्यक्ती माझ्याकडे आली, अभिनंदन केलं, असे ते म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'तुम्हाला दिल्ली घाबरायला लागली, असे म्हणत होते. २०१४ ला बाळासाहेब नव्हते, त्यामुळे शिवसैनिक माझ्या सोबत येणार नाहीत, असं त्यांना वाटत होतं. भाजपची २०१४ मध्ये शिवसेना संपवण्याची भाषा होती. अमित शहा यांनी शब्द पाळला असता तर पाव मुख्यमंत्रिपद असणारे देवेंद्र फडणवीस अडीच वर्षे पूर्ण मुख्यमंत्री झाले असते, असे ठाकरे म्हणाले.

'शिवसेना फोडली नसती तर सर्व ताकद मागे उभी केली असती. महाराष्ट्रात सारखं येण्याची गरज पडली नसती. मी मोदींचा विरोधक नाही, मी आजही त्यांना नरेंद्र भाई म्हणतो. मी आजही त्यांच्याशी संबंध लपवत नाही. पण भाजपची ही नीती बरोबर नाही, तुम्ही मित्रपक्षाला संपवतात. तुम्हाला विरोधक नको, मित्र पक्ष नको, पक्षातील नेते नकोत. तुम्ही शिवराज सिंह, वसुंधरा राजे, फडणीस यांना बाजूला केलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीवर ठाकरे काय म्हणाले?

'मी तुमच्या धार्मिकपणाबद्दल काही म्हणत नाही, तुम्ही उपवास करा. पण देशातील कुणी उपाशी राहणार नाही हे बघा. भाजपला मत मागायला रामाची गरज पडत आहे. मग मोदींनी १० वर्षात काय केलं. राम नवमीच्या आधी निवडणुकांची तारीख... तुम्ही रामाच्या नावावर मत मागताय. राम भरोसे खूप झालं, आता काम भरोसे, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट, भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली

Arvind Kejriwal Arrest : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना CBI कडून अटक, पाहा VIDEO

Sant Tukaram Maharaj Palkhi : तुकोबारायांच्या पालखीला यंदा चेन्नईहून मागविली छत्री; लोखंडाऐवजी बांबूच्या चिमट्यांचा वापर

जव्हारच्या माजी नगराध्यक्षांसह तिघांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Zeeka Virus Symptoms and Treatment : जीवघेणा झिका व्हायरस आहे तरी काय? वाचा लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT