Bhagat Singh Koshyari, Kolhapur, Uddhav Thackeray Faction, Morcha saam tv
महाराष्ट्र

Bhagat Singh Koshyari यांच्यावर गुन्हा दाखल करा; काेल्हापूरात उद्धव ठाकरे गटाचा माेर्चा (पाहा व्हिडिओ)

विशेष पोलीस महानिरीक्षक यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी आज (मंगळवार) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या गटाच्या शिवसेनेच्या वतीने काेल्हापूरात मोर्चा काढण्यात आला. या माेर्चात माेठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले हाेते. (Maharashtra News)

कोल्हापूर शहरातील पितळी गणपती येथून या मोर्चाला सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या माेर्चातील शिवसैनिकांनी (shiv sena morcha at kolhapur) माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी घाेषणा देत निदर्शने केली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (shiv sena leader sanjay pawar) म्हणाले घटनात्मक पद असताना सुद्धा पक्षपातीपणा आणि एका विशिष्ट पक्षाला मदत व्हावी असे निर्णय घेतल्याने माजी राज्यपाल भगतसिंग काेश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीसाठी आजचा माेर्चा हाेता. विशेष पोलीस महानिरीक्षक यांना याबाबतचे निवेदन देण्यात आल्याचे संजय पवार (जिल्हाप्रमुख) यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA : म्हाडाचं घर विकता येतं का? जाणून घ्या घराचे नियम

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, पूस नदीला पूर

दहीहंडीच्या सणाच्या दिवशीच काळानं घात केला, शाळेला सुट्टी असल्यानं दोघे पोहायला गेले, पण..., कुटुंबाचा आक्रोश

Ajanta Caves History: महाराष्ट्रातील अजिंठा वेरुळ लेणीचा लेणी वास्तुकलेचा इतिहास माहिती आहे का?

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

SCROLL FOR NEXT