uddhav thackeray news  Saam tv
महाराष्ट्र

ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री, राजकीय घडामोडींना वेग

uddhav thackeray news : ऐन निवणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. बड्या नेत्याने भाजपमध्ये एन्ट्री केली आहे.

Vishal Gangurde

ठाकरे गटाला बसला मोठा धक्का

पंचायत समितीचे माजी उपसभापतींचा भाजपमध्ये प्रवेश

पक्षप्रवेशामुळे राजकीय हालचालींना वेग

धाराशिवमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापतींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी उपासभापतीच्या भाजप प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे विश्वासू धाराशिव पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय.

या प्रवेशामुळे धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरेंना मोठा धक्का

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी गोर्डे यांचे हजारो समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिंदेसेनेचे नेते संदिपान भुमरेंचे कट्टर विरोधक म्हणून दत्ता गोर्डे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपकडून एकप्रकारे भुमरेंची कोंडी केली जात असल्याची देखील चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुकानाबाहेर भंगार ठेवल्याने वाद पेटला; व्यावसायिकासह वडिलांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Malegaon Politics: ज्यांच्या विरोधात लढले त्यांचाच मागितला पाठिंबा? मालेगावातील राजकारण ३६० डिग्री फिरणार

Besan Chilla Recipe : भाजी खाऊन कंटाळलात? मग ५ मिनिटांत बनवा बेसनाचा कुरकुरीत पोळा

Chum Chum Recipe: लाफ्टर शेफमध्ये दाखवलेली स्वादिष्ट चमचम मिठाई घरच्या घरी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Nashik Crime : पोलिसाची दादागिरी; वकिलाला डोके फुटेपर्यंत मारलं, VIDEO

SCROLL FOR NEXT