kalyan news, Kalyan Dombivli Municipal Transport saam tv
महाराष्ट्र

Kalyan Dombivli Municipal Transport : कल्याण डोंबिवलीकरांना बस उपलब्ध करा : ठाकरे गटाची मागणी

ज्या आगाराला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. त्याठिकाणी साफसफाई झाली नाही तर डेपो पेटवून देण्याचा इशारा शिवसेना पदाधिका-यांनी दिला.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan News : कल्याण डोंबिवली येथील नागरिकांना बसेस उपलब्ध झाल्या नाही तर परिवहन सेवेला टाळे ठोकू असा इशारा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने केडीएमटीला (Kalyan Dombivli Municipal Transport) दिला आहे. आज ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केडीएमटीच्या व्यवस्थापकांची भेट घेत नागरिकांसाठी बसेस उपलब्ध करण्याची मागणी केली. (Maharashtra News)

ठाकरे गटाचे उपनेते व जिल्हाप्रमुख विजय साळवी म्हणाले नुकतेच गणपती, नवरात्र सण झाले. लोकांचे हाल होते. रिक्षा वारेमाप भाडे आकारतात. परिवहन समिती ज्यासाठी स्थापन केली आहे त्याचा फायदा नागरिकांना व्हावा. लोकांना परिवहनची सेवा मिळावी. स्वस्त दरात प्रवास उपलब्ध व्हावा हा मुख्य हेतू हाेता. परंतु सध्या शहराअंतर्गत कोणतीही बस सुरु नाही हे दुर्देव म्हणावे लागेल.

साळवी म्हणाले सर्व बसेस पनवेल, भिवंडी, वाशी नवी मुंबई या मार्गावर चालविल्या जातात. २०१७ साली चार ते पाच लाख उत्पन्न होते. तेच उत्पन्न आजही आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार देते. डिझेल महापालिका पुरविते. हे सर्व मिळत असताना २०० पैकी ६० बसेस रस्त्यावर चालविल्या जातात. १४० बसेस पडून आहेत. २०० चालक वाहक आहेत. त्यापैकी केवळ ६० चालक वाहकांचा वापर केला जात आहे. बाकी कर्मचाऱ्यांना काय फूकटचा पगार द्यायचा का असा सवाल साळवींना उपस्थित केला.

डेपो पेटवून देण्याचा इशारा

दरम्यान परिवहन सेवा दिली नाही तर त्यांच्या कार्यालयास आम्ही टाळे ठोकू. पांढरा हत्ती पोसायचा कसा. लोकांच्या टॅक्समधून पगार दिला जातो. त्यांनी लोकांना सेवा द्यायला नको का. अनेक लोक कामानिमित्त कल्याणला येतात. सामान्य लोकांना रिक्षाचे भाडे परवडत नाही. त्यांनीही परिवहन सेवा बसेस उललब्ध करुन देत नाही. बसेस सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

आगाराची दयनीय अवस्था करुन ठेवली आहे. ज्या आगाराला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे. त्याठिकाणी साफसफाई झाली नाही तर डेपो पेटवून देण्याचा इशारा शिवसेना पदाधिकारी रविंद्र कपोते यांनी प्रशासनाला दिला.

याबाबत परिवहनचे व्यवस्थापक दीपक सावंत (deepak sawant) म्हणाले आमच्याकडे शिष्टमंडळ आले होते. शहरातील नागरीकांना परिवहन सेवा जास्तीत जास्त उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे. नवे मार्ग सुचविले आहे. जे पूर्वी चालू होते. जे काही कालावधीपासून बंद आहे. ते मार्ग सुरु करण्यावर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे.

ते मार्ग आम्ही सुुरु करणार आहोत. २०१७ मध्ये असलेली बसेसची संख्या आणि आजची बसेस संख्या यात कमालीचा फरक आहे. आमच्याकडे ९० बसेस आहेत. त्यापैकी ८० बसेस रस्त्यावर धावतात. त्यापासून ५ लाख रुपयांचे उत्पन्न आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: चांदिवली विधानसभेत शिंदे गटाला धक्का; नसीम खान आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT