रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनी शिवसेनेला राजीनामा दिला.
उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहून राजीनामा सादर केला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जातो.
राठोड पुढे कोणत्या पक्षात जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Uddhav Thackeray shiv sena another major setback : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना कोकणात आणखी एक धक्का बसला आहे. रायगडमधील जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून कोकणात एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. मुंबई, कोकण, ठाणे, नाशिकसह राज्यभरात अनेक दिग्गज नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. रायगडमध्ये पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी नागेंद्र राठोड यांच्या सोपवण्यात आली होती. त्यांनीच पक्षाची साथ सोडल्यामुळे रायगडमध्ये शिवसेना खिळखिळी झाली आहे. नागेंद्र लवकरच आपला राजकीय निर्णय घेणार आहेत. ते कोणत्या पक्षात जाणार? याकडे सर्वांचे नजरा लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नागेंद्र राठोड हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षाच्या संपर्कात आहे. पुढील काही दिवसात ते आपला निर्णय जाहीर कऱणार आहेत. नागेंद्र राठोड यांच्यासह शेकडो समर्थकांनी ठाकरेंच्या शिवसेनाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ठाकरेंच्या शिवसेनेला रायगडात मोठा धक्का मानला जातोय. Uddhav Thackeray Faces Setback in Konkan as Key Leader Resigns from Shiv Sena
ठाकरेंच्या शिवसेनेला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. येथील दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि शिववाहतूक सेनेचे प्रमुख संघटक नागेंद्र राठोड यांनी त्यांच्या दोन्ही पदाचा राजीनामा दिला आहे. आपलं राजीनामा पत्र त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. राजीनामा देण्यामागची कारणं त्यांनी या पत्रात नमूद केलेली नाहीत. विधानसभा निवडणुकीत राठोड यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी रायगडमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याची महत्त्वाची जबाबदारी टाकली होती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेना ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. ते आता पुढे कोणता झेंडा हाती घेणार हे पहाणं महत्त्वाच ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक दिग्गजांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे कोकणात शिवसेना खिळखिळी झाल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी ठाकरेंनी सुरू केली आहे. त्यातच आता नागेंद्र राठोड यासारख्या रायगडमधील बलाढ्या नेत्याने साथ सोडली. राठोड यांची स्थानिक राजकारणात मोठी ताकद होती. पक्ष संघटना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आता त्यांनीच साथ सोडल्याने ठाकरेंना जबरी धक्का मानला जात आहे. नागेंद्र राठोड कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. लवकरच ते याबाबतचा निर्णय जाहीर करतील. राठोड यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनीही राजीनामा दिलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.