Uddhav Thackeray 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राजन साळवी यांच्यानंतर शिंदेंचं ऑपरेशन टायगर, कोकणात उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के

Shiv Sena UBT : उद्धव ठाकरेंना कोकणात धक्क्यावर धक्के बसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे शिवसेनेला गळती लावली आहे. आदित्य ठाकरेंनी ज्यांना जायचे त्यांनी जावे, अशी भूमिका घेतली आहे.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray : कोकणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का सत्र सुरू आहे. संगमेश्वर - चिपळूण या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष बने 15 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. यावेळी त्यांचा मुलगा, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने आणि शेकडो कार्यकर्ते देखील त्यांच्यासोबत असणार आहेत.

संगमेश्वर, चिपळूण आणि लांजामध्ये सुभाष बने यांची ताकद आहे. यावेळी बोलताना विकासकामांसाठी आम्ही शिवसेनेसोबत जात असल्याची प्रतिक्रिया सुभाष बने यांनी दिली आहे. राजन साळवी, सुभाष बने यांच्यासारखे जुने नेते पक्ष सोडत असल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापक्षात सध्या चलबिचल सुरू झाली आहे.

राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशापाठोपाठ आता ठाकरे गटाला रत्नागिरीत धक्का सत्र सुरुच आहे. राजन साळवी यांच्यापाठोपाठ इतर पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिले आहेत. राजन साळवी यांचा छोटा मुलगा अथर्व याने युवा निरीक्षकांचा राजीनामा दिलाय. राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश याने देखील दिला युवा जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला आहे.

राजन साळवी यांचे बंधू संजय साळवी यांनीही उपजिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासाठी कुटुंब त्यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. राजन साळवी यांच्यासोबत त्यांचे बंधू संजय साळवी पुतण्या दुर्गेश साळवी , मुलगा अथर्व साळवी हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकरांना मारहाण

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

एकनाथ शिंदे यांची ताकद आणखी वाढणार; २ पॉवरफुल नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री होणार, राजकीय समीकरण बदलणार

Kundali Matching Tips For Marriage: लग्नासाठी मुला- मुलीचे किती गुण जुळले पाहिजेत?

Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

SCROLL FOR NEXT