Maharashtra Politics: 'जेवढ्यांना फोडायचंय तेवढ्यांना फोडू द्या', 'ऑपरेशन टायगर'वर आदित्य ठाकरे कडाडले

Aditya Thackeray Criticized Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगरद्वारे ठाकरे गटाच्या एकापाठोपाठ एका नेत्याला फोडत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खरपूस टीका केली.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Criticized Eknath ShindeSaam TV
Published On

Aditya Thackeray: 'शिंदे सेनेला जेवढ्यांना फोडायचं आहे तेवढ्यांना फोडू द्या. जे महाराष्ट्र लुटतात त्यांचं कधीही कौतुक करणार नाही.', असा निशाणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदेसेनेवर साधला आहे. आदित्य ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांची ते भेट घेत आहेत. काल त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. आज ते आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरवर संतापले.

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे शिवसेना ठाकरे गट नाराज झाला आहे. या सत्कार कार्यक्रमात शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक देखील केले. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, 'कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्याचा विषय आहे. त्याला संजय राऊत यांनी काल उत्तर दिलं आहे. पक्ष फोडण्याच पाप एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबतच नाही तर महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली आहे.'

Aditya Thackeray
Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकारणाला दिल्लीत फोडणी? काल शिंदेंचा सत्कार आज सेनेचे आमदार-खासदार शरद पवारांच्या भेटीला

तसंच, 'अनेक लोकं पक्ष फोडतात. पण राग या गोष्टीचा आहे की एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचे पाप केले आहे. त्यांनी दिलेलं नाव, चिन्ह चोरण्याचं पाप केलं आहे. त्यापुढे जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठी आम्ही जे करार केले होते ते सगळे प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवण्याचे पाप त्यांनी केले आहे.', असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

Aditya Thackeray
Maharashtra Politics: तुकडाबंदी- तुकडेजोड कायदा रद्द होणार? दांगट समितीचा सरकारला शिफारस

दिल्लीमध्ये असणारे आदित्य ठाकरे हे शरद पवारांची भेट घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी थेट नाही असे उत्तर दिले. 'मी आज शरद पवार यांना आज भेटणार नाही. त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही.', असे त्यांनी सांगितले. तसंच, 'राज्यातील तिन्ही पक्षांनी कोणाला घ्यायचं असेल तर घ्या. गेल्या तीन महिन्यांतील राज्यातील वाद पाहा. मुख्यमंत्री, नंतर मंत्री नंतर आता पालकमंत्री यांचे वाद सुरू आहेत.', असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुतीमधील अंतर्गत वादावर निशाणा साधला.

Aditya Thackeray
Maharashtra Politics: राजन साळवीनंतर ठाकरे गटाला आणखी एक धक्का, निष्ठावंत कार्यकर्ते नितेश राणेंनी फोडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com