Uddhav Thackeray Shiv Sena 
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंना हादरा, जिल्हा प्रमुखांसह शेकडो शिवसैनिक शिंदेसेनेत

Uddhav Thackeray Shiv Sena : उद्धव ठाकरे यांना पश्चिम महाराष्ट्रात जबरी हादरा बसला आहे. जिल्हा प्रमुखांसह शेकडो शिवसैनिक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Namdeo Kumbhar

विजय पाटील, सांगली प्रतिनिधी

Uddhav Thackeray Shiv Sena News : सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडले आहे. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह तालुका प्रमुख, युवा सेना पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. सांगलीमधील शेकडो पदाधिकारी मुंबईत आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. कोकण, मराठवाडा आणि मुंबईनंतर ठाकरेंना आता पश्चिम महाराष्टातही धक्का बसला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह ठाकरे गट शिवसेना व युवा सेनेने ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सांगलीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह तालुका प्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रामगिरी बंगल्यावर सांगलीमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी संजय विभूतेंसह सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख,पदाधिकारी,युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गड शिवसेनेमध्ये योगेश सन्मान मिळत नाही त्याचबरोबर पक्ष वाढीकडे वरिष्ठांकडून कडून दुर्लक्ष करण्यात येत आहे,त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत पक्ष शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची भावना संजय विभूते यांनी व्यक्त केली आहे.तर एकाच वेळी जिल्हा प्रमुखांसह,तालुकाप्रमुख, पदाधिकारी,युवा सेनेचे पदाधिकारी यांचा शिवसेनेला सोडचिट्टी देण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT