Uddhav thackeray News  Saam tv
महाराष्ट्र

Maharashra Politics : उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा हादरा; विदर्भातील दिग्गज नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला

uddhav thackeray News : उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा हादरा बसलाय. विदर्भातील दिग्गज नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला लागलाय.

Vishal Gangurde

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीआधी ठाकरे गटाला धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला लागलेली गळतीच सुरु असल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरेंना आता नागपुरात मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी नागपूर शहर प्रमुख शिंदे गटात एन्ट्री होणार आहे. तसेच नागपुरातील ठाकरे आणि काँग्रेसचे स्थानिक नेतेही शिंदेंच्या सेनेत प्रवेश होणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे सेनेला नागपुरात आणखी एक धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी नागपूर शहर प्रमुख राजू तुमसरे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. रजू तुमसरे हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांचे कट्टर समर्थक आहेत.

उद्धव ठाकरे यांची सेना आणि काँग्रेसचे स्थानिक नेते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या सेनेला गळती सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीआधी पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.

पुण्यात अजित पवारांची ताकद वाढणार, काँग्रेसचा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले रोहन सुरवसे पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबईत देवगिरीमध्ये सोमवारी कार्यकर्त्यांसह रोहन सुरवसे पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. रोहन सुरवसे यांच्यावर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमधील महत्वाची जबाबदारी देणार असल्याचं बोललं जात आहे. पुण्यात कांग्रेस पक्षात असताना सुरुवसे यांनी अनेक आंदोलन केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यामागे राजकारण?सरकार आणि धनखडांमध्ये कुठे पडली ठिणगी?

Goodluck Cafe: 'गुडलक' कॅफेचे पुन्हा 'बॅड लक'; आता अंडा भूर्जीमध्ये आढळलं झुरळ

SCROLL FOR NEXT