Maharashtra Politics : शरद पवार लवकरच अजित पवारांसोबत जातील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील; बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Ravi Rana News : आमदार रवी राणा यांनी शरद पवार आणि अजित पवारांचं नाव घेत मोठा दावा केला आहे. शरद पवार हे लवकरच अजित पवारांसोबत जाईल, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.
Maharashtra Politics
sharad pawar and ajit pawar Saam tv
Published On

अमर घटारे, साम टीव्ही

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. राजकीय घडामोडीदरम्यान अराजकीय संस्थेच्या बैठकांसाठी शरद पवार आणि अजित पवार हजर राहत असल्याचे दिसून येत आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चेदरम्यान शरद पवार लवकरच अजित पवार यांच्यासोबत जातील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Police Transfers : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी खांदेपालट; ५० हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

रवी राणा यांनी अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे. रवी राणा म्हणाले, ' आगामी काळात शरद पवार,अजित पवार, सुप्रिया सुळे हे केंद्रीय स्तरावर एकत्र झाले आहेत. शरद पवार लवकरच अजित पवारांसोबत जातील. तर सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काम पाहून सुप्रिया सुळे सुद्धा केंद्राला ताकदीने पाठिंबा देतील'.

Maharashtra Politics
Palghar News : खवळलेल्या समुद्राचं पाणी थेट पालघरच्या सातपटीत घुसलं, आकाशातून टिपलेले दृश्य, धडकी भरवणारा व्हिडिओ

रवी राणा यांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावरही टीका केली. 'मराठी माणसांविषयी प्रेम आता येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी माणसांसोबत उभा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही नौटंकी थांबवावी. तर मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मराठीचा मुद्दा समोर केला जात आहे.

Maharashtra Politics
Mumbai Metro Line 5 Route : ठाणे- भिवंडी-कल्याण मेट्रोबाबत मोठी अपडेट; उल्हासनगरपर्यंतच्या लाखो प्रवांशाचा सुसाट प्रवास, कसा असेल मार्ग?
उद्धव ठाकरे यांना वाटते की, आमचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकला पाहिजे. तर मराठीचा कोणी महाराष्ट्रात विरोध करत नाही, तर पाच तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा मोर्चा आहे.
आमदार रवी राणा

'मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसच्या दरबारात उद्धव ठाकरे गेले, अशीही टीका रवी राणा यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com