Uddhav Thackeray and Eknath Shinde share one frame after three years at Vidhan Bhavan during Ambadas Danve's farewell ceremony — an image that says more than words. CMO
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिवसेना फुटीनंतर एकाच फ्रेममध्ये, पण ठाकरेंनी शिंदेंना टाळलं, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Ambadas Danve Farewell : १६ जुलै रोजी विधानभवनात अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात ठाकरे व शिंदे तीन वर्षांनंतर एकाच फ्रेममध्ये; फोटो पाहताच चर्चांना उधाण आलं आहे.

Bharat Mohalkar

Uddhav Thackeray, Eknath Shinde : आता पाहूयात 'फोटो ऑफ द डे' म्हटल्या जाणाऱ्या ठाकरे आणि शिंदेंच्या फोटोची गोष्ट.... मात्र या फोटोत नेमकं काय आहे? पाहूयात...

एका फोटोचा सोहळा

तारीख- 16 जुलै 2025

वेळ - संध्याकाळी 5 वाजून ३० मिनिटं

ठिकाण- विधानभवनाच्या पायऱ्या

प्रसंग- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा निरोप समारंभ..

अंबादास दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह सगळे आमदार फोटोसेशनसाठी पायऱ्यावर जमलेले. तेवढ्यात पायऱ्यावरुन गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरे येताना दिसले....ठाकरेंना येताना पाहिलं आणि आधीच येऊन बसलेल्यांमध्ये थोडी चुळबुळ झाली... शिरसाट बाजूला झाले... आणि सगळेच उभे राहिले. ठाकरे आता पहिल्या रांगेकडे आले... त्यांना आपल्याच दिशेने येताना बघून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दोन्ही हातांनी आपला चष्मा उगाचच सावरला...

आता ठाकरे नेमके बसणार कुठं? सगळ्यांच्या नजरा तेच शोधत होत्या... नेमकं हेच फडणवीसांनी हेरलं आणि ठाकरेंना पुढच्या खुर्चीवर बसण्यासाठी हात केला. खुर्ची पण अशी की साथ सोडून गेलेल्या एकनाथ शिंदे आणि निलम गोऱ्हे यांच्या मधली... ठाकरे खुर्चीवर बसायला गेले तसं शिंदेंनी आपला चेहरा दुसरीकडे फिरवला... उपसभापती नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना शिंदेंच्या शेजारच्या खुर्चीवर बसायचा आग्रह केला.. आता सगळ्यांचीच पंचाईत झालेली बघून खुद्द उत्सवमूर्तीच धावत आले आणि त्यांनी ठाकरेना आपल्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला... मात्र त्याला नम्र नकार देत ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंच्या शेजारी बसणं पसंत केलं...या दरम्यान शिंदेंच्या चेहऱ्यावरची चलबिचल काही लपत नव्हती.. अखेर एकदाचा फोटो क्लिक झाला आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. मात्र या फोटोत 3 वर्षानंतर ठाकरे आणि शिंदे एकाच फ्रेममध्ये दिसले आणि सर्वत्रच या फोटोसेशनची चर्चा रंगली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT