Uddhav Thackeray-Eknath Shinde Reunion saam tv
महाराष्ट्र

कोर्टाच्या निकालाआधी ठाकरे- शिंदेंमध्ये मनोमिलन होणार? राजकारणात खळबळ

Maharashtra Politics: शिवसेनेतील फुटीनंतर वेगवेगळ्या गटाचं नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलीय... आणि त्याला कारण ठरलयं...शिंदेसेनेच्या नेत्यानं ठाकरे- शिंदेंच्या एकत्र येण्यावर केलेलं महत्त्वाचं विधान...ठाकरे- शिंदेंच्या एकत्र येण्याचा खळबळजनक दावा करणारा शिंदेंचा तो नेता कोण आहे? खरचं शिंदे- ठाकरे एकत्र येणार का?

Suprim Maskar

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला असतानाच मुंबईत एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरेसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आले... कार्यक्रमाआधी या बड्या राजकीय नेत्यांमध्ये औपचारिक चर्चाही झाली. त्यातच शिंदेसेनेच्या नेत्यानं ठाकरे- शिंदे एकत्र येणार असल्याचा दावा केलाय... 'ठाकरे आणि शिंदेंचं कधीतरी जुळणारच,' असं विधान करत शिंदेसेनेच्या धंगेकरांनी काय भाकित केलयं...ऐका..

दुसरीकडे निकालानंतरच धंगेकरांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, अशी जाहीर मागणी केलीय. अशातच ठाकरे-शिंदेंच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर धंगेकरांना सिग्नल कुठून मिळाला, असा सवाल काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केलाय...तर ठाकरेसेनेच्या राऊतांनी या चर्चा फेटाळून लावलेत...

विधान परिषदेच्या निकालानंतर महायुतीत निर्माण झालेली कटुता आणि त्यानंतर फडणवीस-ठाकरे भेटीमुळे राजकीय समीकरणांवरून वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत... अशातच धंगेकरांच्या या वक्तव्यामुळे शिंदेसेना आणि ठाकरेसेनेत मनोमिलनाच्या चर्चांना उधाण आलयं...मात्र 2022 मध्ये शिंदेंनी केलेलं बंड, भाजपसोबत केलेली हातमिळवणी आणि त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप-प्रत्यारोप पाहता... भविष्यात ठाकरे- शिंदे एकत्र येतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लंडनला एमबीए करायला गेलेली तरुणी अचानक गायब; पिंपरीत बंद फ्लॅटमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

Wakad News : पिंपरी चिंचवडमध्ये मायलेकाची आत्महत्या, १८ व्या मजल्यावरून मारली उडी

CBSE चा 10 वीच्या परीक्षेसाठी मोठा निर्णय! गणितात नापास, तरी होणार पास! नेमकं कसं?

10 Gram Gold Mangalsutra: 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र; रोज वापरण्यासाठी सुंदर आणि आकर्षक 5 डिझाइन्स

Devgad Hapus mango : हापूसच्या पहिल्याच पेटीनं केला मार्केट जाम! 36 हजार रुपये विक्रमी दर

SCROLL FOR NEXT