UDDHAV THACKERAY-FADNAVIS REUNION saam tv
महाराष्ट्र

ठाकरे-फडणवीस एकत्र येणार? पुढच्या पाच महिन्यात राजकीय भूकंप?

Political Earthquake in Maharashtra: विधानपरिषदेत 3 जागांवर पराभव झाल्यानंतर महायुतीत चांगलाच वाद पेटला...मात्र एकीकडे हा वाद शमतो ना शमतो तेच ठाकरे- फडणवीस यांच्या एकत्र य़ेण्याची जोरदार चर्चा रंगलीय...पुढच्या पाच महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार का? ठाकरे- फडणवीस पुन्हा एकत्र येणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

ऐकलतं.... 2019 नंतर उद्धव ठाकरेंनी बोलवलं असतं तर त्यांच्यासोबत एकत्र दिसलो असतो, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केलं... विशेष म्हणजे या पुस्तक प्रकाशनाला दोन्ही ठाकरे बंधू ही उपस्थित होते...आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत या दोन्ही भावांची बंद दाराआड कार्यक्रमाआधी चर्चा ही झाली...त्यामुळे विधान परिषदेनंतर महायुतीत वाद पेटला असतानाच फडणवीसाचं ठाकरे बंधूंसोबत एकाच व्यासपीठावर येणं...नव्या पर्वाची नांदी म्हणायचं का? अशी चर्चा रंगलीय... त्यात राऊतांनीही ठाकरे- फडणवीसांच्या चर्चेतून काही तरी चांगलचं निघेल, असा विश्वास व्यक्त केलाय...

दरम्यान फडणवीसांनी 2019 नंतर उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी बोलावलचं नाही, असं जाहीर विधान केल्य़ानंतर राऊतांनीही नाती अशी तुटत नाही, अस म्हणत फडणवीसांना फुटीवरून सवाल विचारलाय..त्यात राज ठाकरेंनीही याच कार्यक्रमात 2029 पर्यंत फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी ठेवा, असं म्हटलय... त्यामुळे विरोधकांनी केलेल्या येत्या एप्रिल- मे मधील संभाव्य राजकीय भूकंपाची चर्चा पुन्हा रंगलीय..मात्र फडणवीस- ठाकरे एकत्र येण्यावर राजकीय विश्लेषकांचे काय म्हणणं आहे ऐका...

विधान परिषदेच्या निकालानंतर महायुतीत निर्माण झालेली कटुता, कर्जत - भीमाशंकरमधील वृक्षतोडीवरून ठाकरेंनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि आता फडणवीस-ठाकरे बंधूंची बंद दाराआड झालेली गुप्त भेट... या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे नेमकी काय खिचडी शिजतेय? आणि राऊतांनी दावा केल्याप्रमाणे एप्रिल-मे महिन्यात खरोखरच राजकीय भूकंप होणार का? २०१९ नंतर एकाच व्यासपीठावर दिसलेले फडणवीस- ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भरपूर पाणी प्यायल्यानंतरही होतो 'किडनी स्टोन'? नवीन संशोधनाचा धक्कादायक खुलासा

Fact Check: 1 हजाराची नोट पुन्हा चलनात येणार? 1 हजाराच्या नव्या नोटेचा फोटो जारी?

2029 पर्यंत महायुती टिकणार का? विधानपरिषदेत हार, महायुतीत एकमेकांवर वार

Maharashtra Weather Update : पुणे-नाशिकला पावसाने झोडपलं, जिकडे तिकडे पाणीच पाणी; शनिवारी पावसाची काय स्थिती?

Walking Tips for Weight Loss: आठवडाभरात 1 किलो वजन कमी करण्यासाठी किती पावले चालावीत?

SCROLL FOR NEXT