Uddhav thackeray  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Budget : शिंदे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा खरपूस समाचार घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uddhav Thackeray News : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यामध्ये राज्याच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. मात्र, विरोधकांनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र सोडलं. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा खरपूस समाचार घेतला. शिंदे सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा,असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठ्या घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा फडणवीस यांनी केल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली.

'आम्ही ज्या योजना घोषणा केल्या. त्याच बदलून जाहीर केल्या आहेत. मुंबई बाळासाहेब दवाखाना ही आमची योजना राज्यभर राबविण्यात येणार आहे. सर्व घटकांना मधाचा बोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच हा अर्थसंकल्पाबद्दल एका वाक्यात सांगायंचं झालं तर हा अर्थसंकल्प केवळ गाजरचा हलवा आहे, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; अजित पवारांची टीका

शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावरून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विरोधी पक्षनते अजित पवार यांनी जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले, 'चुनावी जुमला असा हा अर्थसंकल्प आहे. शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा, पण स्मारकाच्या बाबतीत साधा उल्लेखही नाही.

'मागील अर्थसंकल्पात आम्ही पंचसूत्री मंडली होती. विकासाचं अमृत - जे कधी दिसणार नाही. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरून आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. किती निधी देणार, याचा ठोस आकडा नाही. बऱ्याच बाबी मागच्या अर्थसंकपतील आहेत', अशीही टीका अजित पवार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack in bathroom: बऱ्याच जणांना बाथरूममध्येच हार्ट अटॅक का येतो? यामागे काय कारणं आहे, जाणून घ्या

Sanjay Shirsat : शिरसाटांच्या हातात सिगारेट अन् बेडवर पैशांनी भरलेली बॅग; संजय राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, VIDEO

Rohit Sharma : रोहित शर्माचा पत्ता कट होणार? कसोटीनंतर वनडेमध्येही शुभमन गिल कॅप्टन बनणार?

Panvel Corporation : शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावणे भोवले; मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षणाधिकाऱ्यास बजावली नोटीस

Maharashtra Live News Update : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT