Uddhav Thackeray Speech In Khed saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Speech: दिल्लीसमोर शेपटी घालून बसणं हे बाळासाहेबांचे विचार नाही, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर 'गोळीबार'

Uddhav Thackeray News: दिल्लीत मुजरे मारायला जाण्यात अर्ध आयुष्य जातय आणि ज्याना मंत्रीपद दिली नाहीत त्यांना सांभाळताना उरलेल जातंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.

Chandrakant Jagtap

Uddhav Thackeray Speech In Khed: शिवसेना नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये गोळीबार मैदानात आज उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. या सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर हल्लाबोल केला. दिल्लीसमोर शेपट्या आत घालुन बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी घरात राहुन जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्हीं घरोघरी जाऊन, गुवाहाटीला फिरुन सांभाळु शकत नाही आहात. दिल्लीत मुजरे मारायला जाण्यात अर्ध आयुष्य जातय आणि ज्याना मंत्रीपद दिली नाहीत त्यांना सांभाळताना उरलेल जातंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.

ठाकरे म्हणाले, सगळे उद्योगधंदे गुजरातला जात होते, कारण गुजरातमध्ये निवडणुका होत्या. आता परवा आयफोनचा प्रकल्प कर्नाटकला गेलाय, कारण आता तिकडे निवडणुका होणार आहेत. हे तुटलेल्या फुटलेल्या एसटीवर हासरे चेहरे टाकुन जाहिराती करत आहेत. माझ्या वेळेस 'माझ कुटुंब, माझी जबाबदारी' ही एकच घोषणा होती, कारण हे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मी अभिमानाने सांगतो मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, माझे वडील अभिमानाने सांगत होते मी प्रबोधनकारांचा पुत्र आहे. आज ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्राची सेवा करत आहे. तुमची वंशावळ सांगा असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. तुम्हांला शिवसेनेचा पक्षप्रमुख मिंधे चालेल का? हे तुम्हीं सांगायचं, निवडणूक आयोगाने नाही. आजपासून आशीर्वाद यात्रा काढत आहेत. तसेच तुम्हीं चोराला आशीर्वाद देणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. (Latest Marathi News)

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, मिंधेच्या हाती धनुष्यबाण होता आणि चेहरा गुन्हेगारासारखा होता. तुमच्या हाती धनुष्यबाण घेण्याचा प्रयत्न करा पण कपाळावर गद्दार आणि हातावर 'मेरा खानदान चोर हैं' हे लिहिलं आहे, ते या जन्मात पुसलं जाणार नाही. तुमच्यासारखे किती आले तरी शिवसेना टिकुन राहणार आहे अशा शब्दात ठाकरेंनी त्यांनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांवर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बिबट्यांच्या हल्ल्या विरोधात शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामस्थ आक्रमक, रोखला महामार्ग

Ananya Pandey: आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूँ...; अनन्याचा रॉयल लूक पाहिलात का?

शेफाली वर्माची बॅट तळपळली; टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरोधात चौकार-षटकारांचा वर्षाव, दिलं इतक्या धावांचं आव्हान

Nepal Politics: सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू; पंतप्रधानांनी बोलवली राजकीय पक्षांची बैठक

अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड|VIDEO

SCROLL FOR NEXT