बांगलादेश आणि मुंबईतील मंदिरे सेफ नाहीत. भाजपचं फक्त मंतांसाठी हिंदुत्व आहे. गप्प बसणारे हिंदुत्व नको. तुम्ही कसलं कटेंगे तो बटेंगे म्हणतात? हिंदूंच्या मुद्द्यांवर उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. राम मंदिर बांधतात आणि राम भक्त हनुमान मंदिर पाडतात. मग हे कसलं हिंदुत्व? असंही ठाकरे म्हणाले.
बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदू यांच्यावर हल्ले होत आहेत. काही महिन्यांपुर्वी बांगलादेशी क्रिकेट संघ आला होता. ज्यावर आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला. पण सत्ताधाऱ्यांकडून उत्तर नाही. बांगलादेशमध्ये सातत्याने हल्ले सुरू आहेत. इस्कॉन मंदिरे जाळण्यात येत आहेत. बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचार सुरूय. तरीही सरकार गप्प का? असा सवाल उपस्थित करत, ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचं नाव न घेत उपरोधिक टीका केलीय. 'रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू होते, तेव्हा विश्वगुरूंनी एका फोनवर रशिया युक्रेन युद्ध थांबवले. आता विश्वगुरू शांत का? बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरूय. तसेच इथेही फोन करून थांबवावे.' बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदू्ंच्या रक्षणावर त्यांनी सवाल उपस्थित केला.
पुढे ते म्हणतात 'पंतप्रधानांचे व्याप खुप आहे. त्यांना देशभरात फिरायचं असतं. मणिपूर प्रकरण जसे त्यांच्या कानावर पडलं नाही, तसे हे प्रकरण देखील कानावर पडलं नसावं.' केंद्र सरकार यावर कोणते पावलं उचलणार आहेत? बांगलादेशतील हिंदुंबाबत काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
'जगातील हिंदू मोदींकडे आशेने पाहतात. भाजप एक है तो सेफ हैचं नारे देतात. इथे मंदिरे सेफ नाहीत, मग हे कसले एक है तो सेफ है म्हणतात? त्यांच्यात थोडी जरी लाज असेल तर, दादर येथील मंदिर पाडण्याचा फतवा आणि सिडको येथील भूखंड कोणाला देणार? याबाबत आधी स्पष्ट करावं.' असं ठाकरे म्हणाले.
'मी फडणवीस यांच्या हिंदू मॉडेल बाबत बोलणार नाही. बेरोजगारीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. बेरोजगारीच्या आकड्यात हिंदू किती आहेत? रामाचे मंदिर बांधतात आणि राम भक्त हनुमान मंदिर पाडतात.' असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.