
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दररोज वेगवेगळ्या, महत्त्वाच्या बैठका सुरु असतात. पंतप्रधान मोदी वर्षभरात कधीही सुट्टी घेत नाहीत, कामात व्यस्त असतात. दरम्यान, पंतप्रधान मोदी संध्याकाळी संसद भवनाच्या बालयोगी सभागृहात 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट पाहणार असल्याची बातमी आहे. त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि अनेक कॅबिनेट मंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
गोध्रा आगीच्या घटनेवर आधारित एकता कपूर आणि विक्रांत मॅसी यांचा हा चित्रपट यूपी, उत्तराखंडसह राज्यांनी करमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. मॅसीचा हा चित्रपट 'द साबरमती रिपोर्ट' १५ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. १२वी फेल आणि सेक्टर २६ सारख्या चित्रपटांतून आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या मॅसीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, तुमच्या पाठिब्यांबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. मात्र, जसजशी मी जीवनात प्रगती करत आहे, तसतशी आता नवरा, वडील आणि एक मुलगा म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे, हे माझ्या लक्षात आले आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना साबरमती एक्सप्रेसच्या एस-6 कोचमध्ये लागलेल्या घटनेवर आधारीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट 4 वाजता नवी दिल्लीतील बालयोगी ऑडिटोरियम इथे पाहणार असून मोदी यांनी या अगोदरच या चित्रपटाचं कौतूक केलं आहे. या चित्रपटात विक्रांत मैसी हे प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला असून चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा विषय अतिशय संवेदनशीलतेने हाताळला आहे. गोध्रा इथे झालेल्या या दुर्घटनेत ५९ जणांचा बळी गेला होता.
पीएम मोदी यांनी चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर कौतुक केलं. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “एकदम योग्य, ही चांगली बाब आहे की, आता सत्य समोर येतय. सर्वसामान्य लोक ते पाहू शकतात. एक फेर नरेटिव काही काळासाठी असतं. शेवटी फॅक्टस समोर येतात” पंतप्रधान मोदी यांनी रि्टवीट करुन चित्रपटाच कौतुक केलं होतं. चित्रपटाबद्दल एका पत्रकाराने ही पोस्ट केली होती. वर्ष 2002 मधील गोध्रा ट्रेन जळीत कांडावर हा चित्रपट आधारित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.