Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार? शेतकरी आंदोलनावरून उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray : ज्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आधीच अश्रू आहेत त्यांच्यावर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडताय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी जनसंवाद मेळाव्यातून मोदी सरकारवर टीकेची तोफ डागलीय. ज्यांच्या मतांवर पंतप्रधान झालात ते तुमच्या घरात आलेले चालत नाही का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(सचिन बनसोड, अहमदनगर)

Uddhav Thackeray In Jansawad Shrirampur :

श्रीरामपूर येथे झालेल्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मोदींची गॅरंटीवरुन भाजपवर घाणाघाती टीका केलीय. देशात कोरोना नाही, मात्र दुसरा हुकुमशाहीचा व्हायरस फोफावतोय. या हुकूमशाहीचा व्हायरसपासून दोन हात लांब रहिलं पाहिजे. देशातील शेतकरी आंदोलनावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केलीय.(Latest News)

हजारो लाखो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर जमलेत. ज्यांच्या मतांवर पंतप्रधान झालात ते तुमच्या घरात आलेले चालत नाही का? तारेचे कुंपण आणि बॅरिकेट लावलेत. ज्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आधीच अश्रू आहेत, त्यांच्यावर अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडताय. त्यांच्या तुम्ही गोळ्या देखील घालाल, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. दिल्लीच्या सीमेवर युपी आणि पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी हमीभावासाठी आंदोलन पुकारलंय. शेतकरी दिल्लीत प्रवेश करून नये म्हणून केंद्र सरकारने जागोजागी अडथळे निर्माण केली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इतर मंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी खडेबोल सुनावले. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या गारपिटीचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. यावरून उद्धव ठकारेंनी अशोक चव्हाण यांना धारेवर धरलं. नांदेडला गारपिटीचा फटका बसला. अशोकरावांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे होते मात्र ते मोदींच्या दारात गेले, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.

पक्ष फोडाफोडीवर काय म्हणाले उद्धव ठाकरे

जनसंवाद मेळाव्यातील भाषणाच्या सुरुवात त्यांनी अशोक चव्हाण यांच्या प्रवेशावरून केली. भाजपमधील आणि आरएसएसमधील निष्ठावंत नेत्यांना आज धक्के बसले. दुसऱ्या पक्षातून भाजपात नेते गेले तेव्हा शिवसेनेला धक्का, काँग्रेसला धक्का असं म्हटलं जात. पंरतु हे धक्के आरएसएस आणि भाजपमधील नेत्यांना बसले आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

अशा भ्रष्टाचारी व्यक्तीला पक्षात घेतल्याने तेथील निष्ठावंत नेत्यांना आज मोठा धक्का लागल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. भाजपला ४०० पारचा आकडा गाठायचा आहे. साठी इतर पक्ष फोडले जाताय. मोदींचे स्वप्न पुरे करायला भाजप सक्षम नाही का? भाजपात लायकी नाही म्हणून इतर पक्ष फोडताय का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT