ज्यांनी थडग्याचा विषय काढला त्यांना आरएसएसनं थडग्यात गाडलंय. अपयश लपवण्यासाठी सरकार एक-एक गोष्टी करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. विधानभवनाच्या परिसरात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलंय. यावेळी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आभार मानले. आरएसएसनं ज्यांनी हा विषय चिघळवलाय त्यांनाच थडग्यात घातलंय, अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केलीय.
राज्यात जे काही चालू आहे, त्यावर काही न बोलता दुसरं जुनं काही प्रकरणं उकरून काढायचा, असा प्रकार सरकारकडून चालू आहे. त्याचमुळे मी आरएसएसला धन्यवाद देत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपच्या नेत्यांकडून औरंगजेब येथील कबरी काढून टाकण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावरून राज्यभरात हिंदू विश्व परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन करत कबर उखाडून टाकण्याची मागणी केली.
त्यानंतर नागपूरमध्ये दंगा पेटला. मात्र उफाळलेल्या हिंसाचारामुळे आरएसएसनं भाजपपासून दोन हात दूर राहणं पसंत केले. त्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. नागपूरमध्ये कोणी दंगल भडकवली आहे, हा संशोधनाचा विषय आहे. या दंगलमध्ये महिला पोलिसांवर हात टाकण्याचा प्रयत्न झाला, त्या गुन्हेगारांवर कारवाई करा. इतकेच नाही तर ज्यांनी दंगल भडकवली आहे, त्यांनाही कायद्याचा इंगा दाखवा असं उद्धव ठाकरे म्हणालेत. "हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करतंय. त्यात ते अपयशी ठरत आहे. या सरकारच्या कारभाराचे धिंडवडे दिवसागणिक समोर येऊ लागले आहेत. वेळ मारुन नेण्यासाठी हा कारभार सुरू असल्याचा आरोपही,उद्धव ठाकरेंनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.