Uddhav Thackeray and Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Shiv Sena: ठाकरे-शिंदे एकत्र येणार? राजधानीत शिवसेना एकीचा नारा; दिल्लीतील बॅनरने महाराष्ट्रात खळबळ

Maharashtra Politics: शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी आता थेट शिवसैनिकांनीच विडा उचललाय. राजधानी दिल्लीत ठाकरे आणि शिंदेंनी एकत्र यावं असं आवाहन करणारे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

Vinod Patil

कधी ठाकरे गटाचे आमदार शिंदे गटात जातील...तर कधी शिंदे गटाचे ठाकरे गटात जाणार अशा चर्चा शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून राज्यात रंगत असतात. मात्र आता ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय. कारण थेट राजधानी दिल्लीत ठाकरे-शिंदे संघटित होण्याचा नारा देण्यात आलाय. महाराष्ट्र सदनाबाहेर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी संघटित होण्याचं आवाहन करणारं मोठं बॅनर निनावी शिवसैनिकांनी झळकवलंय. या बॅनरवर नेमकं काय लिहिलंय ते जणू घेऊ..

राजधानीत शिवसेना एकीचा नारा

शिवसैनिकांनो, वाघांनो... संघटित व्हा ! महाराष्ट्राच्या विकासाला गतिशील बनवा ! आपल्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा, असं या बॅनरवर लिहिलं अहे.

विशेष म्हणजे या बॅनरचं शिंदे गटानं स्वागतच केलंय. दोन्ही गट एकत्र येत असतील तर आनंदाचीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिलीय. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ठाकरे गटाला या बॅनरबद्दल काय वाटतं? तर सामान्य शिवसैनिकाला असं वाटत असेल तर त्याचं स्वागतच आहे. मात्र याचा सर्वस्वी निर्णय ठाकरेंच्या हातात असल्याचं सांगायलाही सुषमा अंधारे विसरल्या नाहीत.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेच्या दोन्ही गटांची समाधानकारक कामगिरी केलीय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामान्य शिवसैनिकांमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र करण्याबाबत भावना निर्माण झाल्या आहेत.

राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर मराठी माणसाच्या बळकटीसाठी उद्धव आणि राज ठाकरेंना एकत्र करण्यासाठी अनेकांनी मोहिमा राबवल्या. मात्र त्याला यश आलं नाही. आता शिंदे आणि ठाकरेंना एकत्र करण्यात तरी यश येणार का? अशी चर्चा हा बॅनर लावल्यानंतर राज्यात रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Maharashtra News Live Update: राज ठाकरे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेणार

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चाणक्यांच्या 'या' 7 गोष्टी कधीही विसरू नका

SCROLL FOR NEXT