Uddhav Thackeray, Eknath Shinde, and Devendra Fadnavis in one frame after three years – silence speaks louder than words as political undercurrents swirl in Maharashtra. Saam TV News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे -उद्धव ठाकरे एकत्र आले; पण एकमेकांकडे बघितलेही नाही; भविष्यातल्या राजकारणाचे काय आहेत संकेत?

Shinde vs Uddhav: ठाकरे आणि शिंदे तीन वर्षांनी एकत्र आले, पण एकमेकांकडे नजर टाळली. फडणवीसांनी युतीची ऑफर दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वळण येण्याची चर्चा सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे तीन वर्षांनंतर एकाच फ्रेममध्ये आले. निमित्त होतं ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे यांचा निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे. विधानभवनाच्या पायऱ्यावर झालेल्या फोटोसेशनमध्ये ठाकरे आणि शिंदे यांचं राजकीय वैर पुन्हा एकदा दिसून आले. नीलम गोऱ्हे, संजय शिरसाट यांच्यापासून ते अजित पवार, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंही बसले होते. उद्धव ठाकरे आले अन् सगळ्यांनी खुर्चीवरून उठून मान दिला. यावेळी एकनाथ शिंदेंही उठले पण त्यांची देहबोली वेगळेच काही सांगत होती. ठाकरे आणि शिंदे समोरासमोर आले पण दोघांनी जवळच्या खुर्चीवर बसणे सोडा एकमेकांकडे बघणेही टाळलं. या फोटोची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

ठाकरे आल्यानंतर निलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या शेजारची खुर्ची ऑफर केली. पण ठाकरेंनी त्या खुर्चीवर न बसता दुसऱ्या खुर्चीवर बसणं योग्य समजलं. दानवेंच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात ठाकरे आणि शिंदेंच्या या कृत्याची अन् देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली. उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला, शिंदेंची बोलणं सोडा बघणंही त्यांनी टाळलं. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना युतीची पुन्हा ऑफऱ दिल्यानेही बुधवारचा दिवस चांगलाच गाजला. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या राजकारणाचे संकेत मिळतात का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रहार केला. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांच्याबाबत त्यांची भूमिका थोडी मवाळ झाल्याचे दिसले. पण शिंदेंवरील राजकीय राग कायम असल्याचे अनेकदा दिसलेय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर ठाकरेंनी त्यांच्या दालनात जात शुभेच्छा दिल्या होत्या. बुधवारी दानवेंच्या निरोप समारंभात ठाकरे आणि फडणवीस यांच्या चर्चा झाली. ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये राजकीय वैर तितके तीव्र नसल्याचे या कृतीवरून दिसतेय. त्यात ठाकरेंना फडणवीस यांनी ऑफर दिल्याने नव्या राजकारणाची चर्चा रंगली आहे.

उद्धवजी तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल, अशी ऑफर फडणवीस यांनी ठाकरेंना दिली. विशेष म्हणजे, ज्यावेळी फडणवीस आणि ठाकरेंचा हा संवाद झाला, त्यावेळी एकनाथ शिंदे तिथेच उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव अनेकांनी टिपला. फडणवीस अन् ठाकरे यांची चर्चा सुरू असताना इतर दिग्गज नेतेही त्यांच्यासोबत उपस्थित होते, पण दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदे एकटे पडल्याचे दिसले. बुधवारी विधानभवनात झालेल्या घडामोडीनंतर भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं काही घडणार का? याची चर्चा दबक्या आवाजात आमदारांमध्ये आणि राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT