१९१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं इंजिन हवेतच बिघडलं, १७ मिनिट घिरट्या मारल्या, मग...

Indigo flight engine failure mid-air Delhi to Goa : इंडिगोचे दिल्लीहून गोव्याकडे जाणारे विमान हवेतच इंजिन फेल झाल्यानंतर मुंबईत सुरक्षित लँडिंग झाले. १७ मिनिटांपर्यंत घिरट्या मारल्यानंतर पायलटने शंभर टक्के दक्षतेने १९१ जणांचे प्राण वाचवले.
Indigo Flight
Indigo flight 6E 6271 made an emergency landing in Mumbai after mid-air engine failure — 191 passengers were safely evacuated thanks to the pilot’s alert response.x
Published On

Indigo Flight Emergency Landing : दिल्लीवरून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे (Delhi To Goa Indigo Flight) बुधवारी रात्री मुंबईमध्ये आपत्कालीन (इमरजन्सी) लँडिंग करण्यात आले. १९१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचे हवेतच एक इंजिन खराब  (Indigo Flight Engine failure) झालं होतं. तब्बल १७ मिनिट विमान हवेतच घिरट्या मारत होतं. १९१ प्रवाशांचा जीव मुठीत होता, पण पायलटच्या प्रसंगावधानामुळे सर्वांचा जीव वाचला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण पायलटच्या प्रसंगावधानामुळे सर्व १९१ प्रवासी सुरक्षित आहेत.

दिल्लीहून गोव्याला जाणारं विमान इंजिन खराब असल्यामुळे मुंबईमध्ये उतरवण्यात आले. १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेनंतर विमानात बिघाड झाल्याच्या अनेक प्रकरणं समोर आली आहे. आरटीआय रिपोर्ट्सनुसार, मागील पाच वर्षात भारतात विमानाचे इंजिन खराब झाल्याची ६५ प्रकरणं समोर आली आहे.

Indigo Flight
Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

नेमकं काय झालं?

इंडिगोच्या फ्लाईट क्रमांक 6E 6271 या विमानाने बुधवारी दिल्ली विमानतळाहून गोव्याकडे उड्डाण केले होते. पण उड्डाणानंतर काही वेळातच इंजिन बिघडल्याचे समोर आले. विमान १७ ते १८ मिनिटे हवेतच घिरट्या मारत होते. पायलटने तात्काळ मुंबई विमानतळावर विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. याबाबत पायलटने एटीएससी संपर्क केला अन् मुंबई विमानतळावरील आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली. विमानाचे सुरक्षित लँडिंग पार पडले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. इंडिगोने तात्काळ प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली.

Indigo Flight
फोटोच्या चक्करमध्ये ६ फूट खड्ड्यात कोसळला डॉक्टर, व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

विमानाचे इंजिन फेल -

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-गोवा विमानाचे एक इंजिन हवेत असताना बंद पडले. त्यानंतर पायलटने तात्काळ ATC ला माहिती दिली आणि मुंबईत आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. रात्री 9:25 वाजता आपत्कालीन सायरन वाजवल्यानंतर, विमानतळावर पूर्ण आपत्कालीन प्रोटोकॉल लागू करण्यात आले. फायर टेंडर आणि रुग्णवाहिका स्टँडबायवर ठेवण्यात आल्या होत्या. विमान रात्री 9:42 वाजता मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

Indigo Flight
Maharashtra Politics : शिवसेना फुटीनंतर एकाच फ्रेममध्ये, पण ठाकरेंनी शिंदेंना टाळलं, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com