Uddhav Thackeray Saam Digital
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : तर राऊतही भाजपमध्ये गेले असते..., अकोलेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

Lok Sabha Election 2024: संजय राऊत यांच्यावरही आरोप करण्यात आले, ईडीची चौकशी लावण्यात आली. भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली, मात्र संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे ते अशा कारवायांना निर्भिडपणे सामोरे गेले, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.

Sandeep Gawade

Uddhav Thackeray

केंद्रीय यंत्रणांचा सरकारकडून दुरुपयोग सुरू आहे. ईडीची भीती दाखवून भाजपमध्ये घ्यायचं. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांनाच पुन्हा पक्षात घेण्याचा प्रकार सुरू आहे. संजय राऊत यांच्यावरही आरोप करण्यात आले, ईडीची चौकशी लावण्यात आली. भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली, मात्र संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळे ते अशा कारवायांना निर्भिडपणे सामोरे गेले. वायकर आणि बाकीच्यांना भाजपात येण्याची मुदत दिलीय, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.

नगर जिल्ह्यीतील अकोलेमध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. राज्यात घटनाबाह्य सरकार आहे ते जेवनाची व्यवस्था करतात तरी खुर्च्या रिकाम्या राहतात. आज या रणरणत्या उन्हात उकोलेतील जनता माझ्यासाठी आली आहे. त्यामुळे मी एकटा नाही. महाराष्ट्र माझ्या पाठीमागे आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकरी हमीभावासाठी भांडत आहे पण तुम्हाला भाव नाही. जो गद्दारी करतो त्याला जास्त भाव दिला जोतो. अशोक चव्हाण यांना खासदारकी दिली अंगणवाडी आशा सेविका संपावर आहेत त्यांचे प्रश्न ऐकायला कोणी आले नाही. सरकार आपल्या दारी म्हणत आहे तर मग आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दारी का जात नाही. नरेंद्र मोदी रडून काहीतरी सांगतात, तुम्ही लगेच भुलता. मात्र त्यांनी दहा वर्षे काय केलं?

महाविकास आघाडी म्हणजेच आमच्या सरकारच्या काळात आम्ही कर्जमाफी केली. 10 वर्षात कापूस आणि सोयाबीनचा भाव किती वाढला. शेतकऱ्याकडे जाऊन हमीपत्र घेतले आहे. त्यामुळे कुणावर गुन्हा दाखल करणार प्रत्येक पिकाचा एकरी खर्च काढू आणि पन्नास टक्के रक्कम वाढवून पैसे देणार होते. आता अशाच टाळ्या वाजवल्या आणि डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली. पाण्याच्या तोफा, अश्रुधुराचा मारा करत आहेत. शेतकऱ्यांना अमित शहा आणि मोदी जाऊन का भेटत नाहीत. मी शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन उभा राहतो आणि बोलतो तुम्ही का बोलत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT