Aditya Thackeray: भाजपची नवी मोहीम 'दाग अच्छे है!' राज्यसभा उमेदवारीवरुन आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

Maharashtra Politics: गेल्या ४० दिवसांत काँग्रेस सोडून त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय आणि त्यांच्यापैकी किमान २ जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. काँग्रेसविरोधात लढणारे भाजपचे कार्यकर्ते कुठे गेले? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
Aditya Thackeray News
Aditya Thackeray NewsSaamtv
Published On

Maharashtra Politics:

महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून नुकतेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून काँग्रेसमधून गेलेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून आलेल्या दोघांना राज्यसभेवर पाठवल्याने आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हणालेत आदित्य ठाकरे?

"भाजप काँग्रेस-मुक्त राजकारण, घराणेशाही-मुक्त राजकारण आणि भ्रष्टाचार-मुक्त राजकारण असा दावा करत आहे. मात्र महाराष्ट्रातील भाजप पुरस्कृत खोके सरकार कदाचित महाराष्ट्र काँग्रेसच्या तीन लोकांना राज्यसभेवर पाठवत आहे, ते सर्व घराणेशाहीचे आहेत," असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

तसेच "गेल्या ४० दिवसांत काँग्रेस सोडून त्यांच्या पक्षात प्रवेश केलाय आणि त्यांच्यापैकी किमान २ जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. काँग्रेसविरोधात लढणारे भाजपचे कार्यकर्ते कुठे गेले? विशेषत: जे काँग्रेसचा द्वेष करतात? सर्व भ्रष्टाचारी महाराष्ट्र भाजपमध्ये सामावून घेत आहेत. मला वाटते आता भाजपची मोहीम 'अच्छे दिन नाही, तर दाग अच्छे है," अशी खोचक टीकाही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केली आहे.

Aditya Thackeray News
Uddhav Thackeray : तर राऊतही भाजपमध्ये गेले असते..., अकोलेच्या सभेत उद्धव ठाकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

दरम्यान, भाजपच्या राज्यसभा उमेदवारीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही निशाणा साधला आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची यादी बघितल्यावर त्याची किव येते. आयात केलेले उमेदवार त्यांनी दिलेत. यामुळे त्यांच्या मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय. ही डाका टाकायची पद्धत सुरु आहे, असे नाना पटोले म्हणालेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aditya Thackeray News
Ajit Gopchade: कारसेवक, बालरोगतज्ज्ञ ते थेट राज्यसभेची उमेदवारी; कोण आहेत अजित गोपछडे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com