Uddhav Thackeray Raj Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Uddhav-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरेंनी एकत्र यावं का? महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्याचं मोठं वक्तव्य

Balasaheb Thorat On Uddhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येण्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काळात मोठी घडामोड घडू शकते, असा अंदाज आहे. आता काँग्रेसच्या दिग्गज नेत्यानंही याबाबत मोठं विधान केलं आहे.

Nandkumar Joshi

सचिन बनसोडे, संगमनेर / अहिल्यानगर

मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिलेल्या पहिल्या टाळीला उद्धव ठाकरेंनीही 'पॉझिटिव्ह' प्रतिसाद दिलाय. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मनसे आणि ठाकरे गटाकडूनही या युतीला 'वेलकम' केलं जात आहे. आता महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यानं ठाकरे बंधूंच्या युतीबाबत महत्वाचं विधान केलं आहे.

ठाकरे बंधू एकत्रित येण्याबाबत महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचं विधान केले आहे. राजकीय मतभेद असू शकतात मात्र ते व्यक्तीद्वेषाचे नसावे. कुणी एकत्र येत असेल तर हरकत नाही, असे थोरात म्हणाले.

ठाकरे बंधूंना पुरोगामी विचारांची परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र धर्माची परंपरा होती. जनतेच्या हितासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं, असंही थोरात म्हणाले.

उद्धव ठाकरे सकारात्मक - राऊत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबतच्या चर्चेवर विधान केलं होते. राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर चांगले, असे पवार म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार यांच्या तोंडात साखर पडो. त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या. एकेकाळी राज ठाकरे यांनी त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. या भावना आहेत. त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. स्वतः उद्धव ठाकरे अत्यंत सकारात्मक आहेत. हा विचार भविष्यात महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

जातनिहाय जनगणनेवर बाळासाहेबांची प्रतिक्रिया

काँग्रेससह विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेला नेहमीच विरोध केला, असा आरोप भाजपने केला होता. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. बाळासाहेब थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधी आग्रही होते. देशभरात आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. याला उपाय म्हणजे प्रत्येक जातीची आकडेवारी उपलब्ध असणे. जनगणना झाल्यास ज्याचा त्याचा वाटा देता येईल. २०१४ नंतर आंदोलने वाढली, असा टोला लगावतानाच काळानुरूप प्रश्न सोडवावे लागतात, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT