raj thackeray uddhav thackeray x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : सरकारविरोधात आवळणार एकीची वज्रमूठ, युतीबाबतही राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत

Thackeray : 2 दशकांनी दोन दुरावलेले भाऊ 5 जुलैला एकत्र येणार आहेत. मोर्चा तर रद्द झाला मग ठाकरे बंधू कशासाठी एकत्र येणार आहेत? ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येण्याची नेमकी रणनीती काय? पाहूयात....

Bharat Mohalkar

सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय रद्द करुन मोठा मास्टरस्ट्रोक खेळला... त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही? अशी चर्चा रंगली होती.. मात्र अखेर ठाकरे बंधूंनी 5 जुलैला एकत्र येऊन विजयोत्सव साजरा करण्याचा निर्धार केलाय.....

राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे बंधूंनी सरकारविरोधात एल्गार पुकारला. तर मराठी बांधवांनी राज्यभर ठिकठिकाणी हिंदीसक्तीच्या शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त केला.. त्यामुळे पावसाळी अधिवेशन हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर तापण्याची शक्यता असल्याने सरकारने यु-टर्न घेत हिंदीसक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले... मात्र त्यानंतर ठाकरेंनी एकत्र येऊन विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही खोचक टोला लगावलाय...

राज्य सरकारने जीआर रद्द केल्यानंतर डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलीय.. ही समिती 3 महिन्यात हिंदीसक्ती संदर्भात निर्णय घेणार आहे.. तर या समितीच्या निर्णयानंतर सरकार त्रिभाषा संदर्भात निर्णय घेईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीय..मात्र समितीच्या शिफारशीनंतरही हिंदीसक्तीचा निर्णय घेतला तर त्यालाही आपला विरोध राहणार असल्याची भूमिका ठाकरे बंधूंनी घेतलीय. तर दुसरीकडे राज ठाकरेंनी युतीबाबतही संकेत दिलेत.

शिवसेना सोडल्यानंतर तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चासाठी नाही तर विजयोत्सवासाठी एकाच व्यासपीठावर येणार आहेत.. त्यामुळे हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी आवळलेली एकीची वज्रमूठ महापालिका निवडणुकीतही कायम ठेवणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lek Ladki Yojana: लेकीसाठी सरकार देणार १ लाख रुपये! योजनेसाठी अर्ज कसा करायचा, कोणाला मिळणार लाभ?

Diabetes Control Food: मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठी नियमित खा 'हे' ५ पदार्थ

Bread Uttapam: नाश्त्यासाठी १५ मिनिटांत बनवा बनवा ब्रेड उत्तपम, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण; राहुल गांधींना जामीन

Fashion Tips: श्रावणात काळ्या रंगाची साडी नेसली तर चालेल का?

SCROLL FOR NEXT