प्रत्येकवेळी मी नाही मी नाही म्हणणाऱ्यांना मुस्कडले पाहिजे - उदयनराजे संतापले
प्रत्येकवेळी मी नाही मी नाही म्हणणाऱ्यांना मुस्कडले पाहिजे - उदयनराजे संतापले Saam Tv News
महाराष्ट्र

प्रत्येकवेळी मी नाही मी नाही म्हणणाऱ्यांना मुस्कडले पाहिजे - उदयनराजे संतापले

ओंकार कदम

सातारा: खासदार उदयनराजे भोसले क्रीडा अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रचंड संतापले. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका त्यांनी टीका केली आहे. प्रत्येकवेळी मी नाही मी नाही म्हणणाऱ्यांना मुस्कडले पाहिजे असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. (udayanraje got angry in sports officer meeting in satara)

हे देखील पहा -

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा एसटी स्टँड नजीक काही वर्षांपूर्वी उभारलेल्या क्रीडा संकुलना बाबत संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. चुकीच्या पद्धतीने हे संकुलन उभे केले असल्याचा आरोप त्यांनी केला असून त्याकाळी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या, मात्र आता भरवता येत नाहीत. ज्या बी. जी. शिर्के यांच्यासारख्या व्यक्तींनी बालेवाडी स्टेडियम बनवले अशा मोठ्या उद्योगपतीने या ठिकाणी टेंडर साठी अर्ज भरले होते त्यांना नाकारले.

हे सर्व समोर येणे गरजेचे आहे, यामधूनही सर्व आमदार-खासदार माकड आहेत त्यांनी यातून बोध घ्यायला हवा. त्यावेळचे साताऱ्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी उत्तर द्यावे. प्रत्येक वेळेस मी नाही असं सांगितलं जातं यांना मुस्कडले पाहिजे. स्टेडियमचे टेंडर काढले असताना स्टेडियमच्या बाहेरून गाळे कशे बनवले असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT