Udayanraje Bhosale Saam TV
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : शिवरायांचा अपमान पाहण्यापेक्षा मेलेलं बरं; पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले भावुक

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, हे असं ऐकण्यापेक्षा मेलेलं बरं असं उदयनराजे या वेळी म्हणाले.

Dnyaneshwar Choutmal

Udayanraje Bhosale : राज्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशात आता खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील पत्रकार परिषदेत राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. 'शिवरायांचा अपमान पाहण्यापेक्षा मेलेलं बरं' असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले या पत्रकार परिषदेत भावुक झाले.

सोमवारी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची शिवप्रेमींसोबतची बैठक संपन्न झाली. या नंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, सातत्याने महाराजांची अवहेलना होत आहे. आज कोणताही परदेशी माणूस भारतात आला तर त्याला विमानतळावर महाराजांच नाव दिसतं. मग हे सगळं कशासाठी करता. जर तुम्हाला सतत अवहेलना करायची आहे तर मग हे तरी कशाला? आता इथे हे सर्व बोलताना इतक्या वेदना होत आहेत की, मेलो असतो तर ते बरं झालं असतं, असं उदयमन राजे भावुक होऊन म्हणाले.

सर्वच पक्षांवर उदयनराजे नाराज

प्रत्येक कार्यक्रमात महाराजांची प्रतिमा असते. पण नेमकं एवढ्या मोठ्या प्रमाणात विकृत वक्तव्य, चित्रपट असेल यातून जेव्हा जेव्हा अवहेलना केली जाते. गलिच्छ चित्र निर्माण केलं जातं तेव्हा राग कसा येत नाही ? असा सवाल त्यांनी सर्वच पक्षांना केला. शिवाजी महाराजांच नाव घेता तेव्हा मनात एकच अजेंडा असतो. महाराजांचा अदर पण तसं नसेलच तर मग शिवाजी महाराजांच नाव तरी कशाला घ्यायचं, असंही यावेळी उदयनराजे म्हणाले.

तसेच पुढच्या पिढीसाठीची चिंता व्यक्त करत ते म्हटले की, असं विकृतीकरण थांबवलं नाही, तर राजे पुढच्या पिढी पर्यंत कसे जातील. ही एकटी माझी जबाबदारी नाही. सर्वांची जबाबदारी आहे. यांच्या हातात सर्व काही दिलं आहे का? व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रपुरुषांची अवहेलना करण्याची मुभा दिलीये का? राष्ट्रद्रोहाच्या कलमात समावेश झाला पाहिजे की महापुरुषांचा अपमान होता कामा नये. नाहीतर हे त्यांना हवा तसा तोडून मोडून इतिहास उभा करतील.

जुना इतिहास (History) म्हणता, नवा इतिहास सांगा असं म्हणत उदयन राजेंनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं. अशात याच्या निशेधार्थ उदयनराजे भोसले ३ डिसेंबर रोजी रायगडावर मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झालेले दिसतील. उदयनराजे रायगडावर राज्यपालांच्या वक्तव्यावर आक्रोश व्यक्त करतील अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना मिळणार हक्काची घरे

Milk Rate : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ; कुठे घेतला निर्णय? वाचा

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर, सुनेत्रा पवारांसह या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

Political News : इस्त्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ; नेतन्याहूंची सत्ता धोक्यात!

Health Tips: सतत हात-पाय थंड पडतात? शरीरातील 'या' ७ समस्या असू शकतात कारणीभूत!

SCROLL FOR NEXT