Udayanraje Bhosale News saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale Drive Bullet: शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त निघालेल्या दुचाकी रॅलीत उदयनराजे भोसलेंची स्टाईलमध्ये बुलेटस्वारी!

Shiv Rajyabhishek Sohala: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त साताऱ्यात निघालेल्या दुचाकी रॅलीत उदयनराजेंनी थेट बुलेटवरून सहभाग घेतला.

Chandrakant Jagtap

>>ओंकार कदम, सातारा

Bullet driven by Udayanraje Bhosale : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या हटके आणि बिनधास्त स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त साताऱ्यात निघालेल्या दुचाकी रॅलीत उदयनराजेंनी थेट बुलेटवरून सहभाग घेतला. त्यांच्या या बुलेट रायडिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आज पोवई नाका येथील शिवतीर्थावर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त त्यांच्या पोवई नाक्यावरील पुतळ्याला अभिवादन केले.

यावेळी शिवप्रेमींनी आयोजित केलेल्या 350 दुचाकी रॅलीमध्ये बुलेट उदयनराजे सहभागी झाले आणि थेट बुलेट चालवत त्यांनी शिवप्रेमींचा उत्साह वाढवला. पोवई नाका येथून सुरू झालेली रॅली राजवाडा मार्गे पुन्हा शिवतीर्थावर संपन्न झाली. या रॅलीमध्ये शेकडोच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते.

यावेळी छत्रपती उदयनराजे यांनी आपली प्रतिक्रिया देत 350 वर्षे पूर्ण होऊन आजही शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मोठा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असल्याची भावना व्यक्त केल आहे. (Latest Political News)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT