mp udayanraje bhosale, satara, satara water cut news saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : तुम्हांला वठणीवर आणायला वेळ लागणार नाही : उदयनराजे भाेसले

गेल्या काही दिवसांपासून पश्चिम भागात दूषित पाणीपूरवठा हाेत आहे.

Siddharth Latkar

Satara News : गेल्या काही दिवसांपासून सातारा शहरातील पश्चिम भागात दूषित पाणीपूरवठा हाेत असल्याचे कारणास्तव सातारा (satara) पालिकेच्या प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (ता. 18) ढाेणे काॅलनी, मंगळवार पेठेतील नागरिकांनी माेर्चा काढत माेती चाैकातील वाहतुक राेखून धरली. आता या आंदाेलनाची दखल खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी देखील घेतली असून नागरिकांच्या भावनांशी आणि त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सहन करून घेतला जाणार नाही असा इशारा राजेंनी (udayanraje latest news) पालिका प्रशासनाला दिला आहे. (Maharashtra News)

खासदार उदयनराजे भाेसले यांनी पत्रकाद्वारे पालिका प्रशासनास सुनावले आहे. स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शहराच्या पश्‍चिम भागाला अशुद्ध, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असेल तर ते अत्यंत क्लेशदायी आहे. नागरिकांच्या भावनांशी व जिवाशी खेळण्याचा प्रकार सहन करून घेतला जाणार नाही असेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

पाणीपुरवठ्याच्या वितरण पद्धतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने सुधारणा करावी. ज्यांना काम जमत नसेल तर त्यांनी तातडीने आपली बदली करून घ्यावी असेही उदयनराजेंनी त्यांच्या म्हटलं आहे.

शहराच्या पश्‍चिम भागात गेल्या तीन महिन्यांपासून रामाचा गोट, मंगळवार पेठ भागात दूषित पाणीपुरवठ्याबाबत सातारा विकास आघाडीने प्रशासनाला सूचनाही केल्या होत्या. परंतु प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून बसले असेल तर अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना वठणीवर आणायला वेळ लागणार नाही असे राजेंनी त्यांच्या पत्रकात नमूद केले आहे.

स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा हा नागरिकांचा हक्क आहे. कास धरणाची उंची वाढवण्यात आली आहे, धरणापासून नवीन अतिरिक्त जलवाहिनीदेखील मंजूर करण्यात आली आहे. पश्‍चिम भागातील पाणीपुरवठ्याबाबत माहिती घेतली असता फिल्टर केलेले पाणी सोडण्याऐवजी डेड स्टॉकमधील पाणी संबंधित कर्मचाऱ्यांनी सोडल्याने निदर्शनास आले आहे.

त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करा अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. पाणीपुरवठ्याच्या वितरण पद्धतीत अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीने सुधारणा करावी. ज्यांना काम जमत नसेल तर त्यांनी तातडीने आपली बदली करून घ्यावी. शहराच्या पश्‍चिम भागातील अपुरा व शुद्ध पाणीपुरवठा तत्काळ थांबवा. शुद्ध आणि अधिक दाबाने पाणी द्या, असेही राजेंनी म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT