Shahu Chhatrapati Gold Cup Football Tournament News : शिवाजी तरुण मंडळाने जिंकला शाहू छत्रपती गाेल्ड कप; Chenda वाद्याची राजघराण्याला भूरळ (पाहा व्हिडिओ)

हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलाेट गर्दी झाली हाेती.
shivaji tarun mandal, shahu chattarapati gold cup, kolhapur news
shivaji tarun mandal, shahu chattarapati gold cup, kolhapur newssaam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : शाहू छत्रपती गोल्ड कप अंतिम सामन्याचे आकर्षण ठरलेल्या केरळ मधील पारंपरिक चेंडा वाद्यचा शाहू छत्रपतींनी मनसोक्त आनंद घेतला. सामना झाल्यानंतर स्वतः शाहू छत्रपती महाराजांनी केरळ वरून आलेल्या या सर्व कलाकारांच्या कलेला दाद दिली. त्याशिवाय या वाद्याच्या तालावर त्यांनी ठेका सुद्धा धरला. (Maharashtra News)

shivaji tarun mandal, shahu chattarapati gold cup, kolhapur news
Udayanraje Bhosale On Sharad Pawar : विश्वासघात... उदयनराजेंनी एका वाक्यात शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा घेतला समाचार

कोल्हापूरात जवळपास 50 वर्षांचा इतिहास असलेली छत्रपती शाहू गोल्ड कप स्पर्धा यावर्षी पार पडली. यामध्ये केवळ कोल्हापूरातले संघ नाहीत तर देशपातळीवरील नावाजलेले क्लब सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात तब्बल 18 वर्षांनंतर पार पडलेल्या स्पर्धेतील गोल्ड कपवर (All India Shahu Chhatrapati Gold Cup Football Tournament) कोल्हापूरातल्या शिवाजी तरुण मंडळाने आपले नाव कोरले आहे. या संघाने केरळ राज्य विद्युत मंडळाच्या संघावर मात केली.

shivaji tarun mandal, shahu chattarapati gold cup, kolhapur news
Saam Tv Exclusive : काेकणातील हापूस की कर्नाटकी ? आंबा खरेदीपुर्वी असं ओळखा (पाहा व्हिडिओ)

दरम्यान, आजच्या सामन्यावेळी सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे केरळमधील पारंपरिक चेंडा वाद्य कलाकारांनी. त्यांनी त्यांची कला सादर करीत प्रेक्षकांचे मन जिंकले. यावेळी शाहू छत्रपती (Shahu Chhatrapati) महाराजांनी देखील कलाकारांना त्यांच्या व्यासपीठानजीक जात दाद दिली.

यावेळी संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati), मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati) यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com