udayanraje bhosale & shivendraraje bhosale. satara politics Saam Tv
महाराष्ट्र

Udayanraje vs Shivendraraje : चर्चा तर हाेणारच ! ठेकेदारांविषयी बाेलताना उदयनराजेंचा राेख शिवेंद्रसिंहराजेंवर ?

शहरातील विविध विकास कामांचा आढावा खासदार उदयनराजे भाेसले यांनी घेतला.

ओंकार कदम

Satara News : राजाश्रय असणाऱ्या त्याच बरोबर निकृष्ट दर्जाचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा असा आदेश खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांनी पालिकेच्या मुख्याधिका-यांना दिला आहे. उदयनराजेंनी जरी काेणत्या लाेकप्रतिनिधीची नाव घेतले नसले तरी त्यांचा राेख आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale news) यांच्यावर असल्याची चर्चा पालिकेच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.  (Maharashtra News)

सातारा पालिकेच्या माध्यमातून झालेल्या शहरातील विविध विकास कामांचा आढावा खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी घेतला. यावेळी महादरे तळे भैरोबाचा पायथा, गडकर आळी, शाहूपुरी, शाहूनगर , गोळीबार मैदान या परिसरात भेटी देऊन या भागात सुरू असलेल्या विकास कामांच्या बाबत तेथील कामाचां दर्जा चांगला आहे का? ही माहिती राजेंनी घेतली.

यावेळी उदयनराजेंनी मुख्याधिका-यांशी चर्चा करताना कॉन्ट्रॅक्टरने काम त्यांच्या वेळेच्या अवधीमध्ये केलं पाहिजे. अन्यथा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करा असा आक्रमक पवित्रा घेतला.

सातारा (satara) शहरात सध्या खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे या दोघांच्या माध्यमातून विकासकाम चालू आहेत. मात्र काही ठिकाणच्या कामाचा निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप करत काही कामे वेळेत पूर्ण झाली नसल्याने राजाश्रेय असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांना ब्लॅकलिस्ट करा असे उदयनराजे यांनी नाव न घेता आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरवर टीका केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Court Fine: प्रसिद्ध अभिनेत्रीला मोठा झटका, ग्राहक आयोगाने ठोठावला ४.२५ लाखांचा दंड; नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: संत मुक्ताईंच्या पालखीचा मार्ग खडतर

Monsoon Health: पावसाळ्याच्या दिवसात सकाळी उठल्यावर ही 3 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

नव्या नवरीसाठी १ ग्रॅम मंगळसूत्राच्या लेटेस्ट डिझाईन्स; गळ्यात दिसतील उठून

Beed Crime: बीड हादरले! ऊसतोड मजुराचे अपरहण, ४ दिवस डांबून ठेवत रक्त येईपर्यंत मारहाण; तोंडात लघुशंका केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT