सातारा : सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal Latest News Highlights) यांनी आजपर्यंत अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांच्या या कार्याचा कृतज्ञतापूर्वक आदर करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशी भावना खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी व्यक्त केली आहे. (udayanraje bhosale pay homage to padma shri awardee sindhutai sapkal)
सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचे मंगळवारी रात्री पुण्यात (pune) निधन (Sindhutai Sapkal Passes Away) झाले. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राज्यासह देशातील नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक सिंधूताईंना आदरांजली वाहत आहेत.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी देखील सिंधूताई सपकाळ (Sindhutai Sapkal Latest updates) यांना आदरांजली वाहिली आहे. ते लिहितात 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन झाले. अनाथ मुलांना आधार देत त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. अतिशय खडतर असे आयुष्य त्या जगल्या. पण या संघर्षातून त्यांनी अनाथ, दु:खी, कष्टी जनांच्या आयुष्याला आधार दिला. त्यांच्या या कार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.