Udayanraje Bhosale News : छ्त्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार इंग्लंडच्या सरकारकडे संग्राहलायत आहे. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारी आहे. भारताचा तसाच महाराष्ट्राचं स्वाभिमान आहे यामुळं जनभावना लक्षात घेवुन ही तलवार मोठ्या मनानं ब्रिटिश सरकारनं भारताकडं सोपवली पाहिजे असं मत खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी साता-यात (satara) व्यक्त केले. (Satara Latest Marathi News)
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज सातारा जिल्हा दाै-यावर आले आहेत. बावनकुळे यांनी आज खासदार उदयनराजे भाेसले यांची भेट घेतली. जलमंदिर पॅलेस येथे दाेन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर बावनकुळे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या भेटीला सुरुची बंगला येथे रवाना झाला. माध्यमांशी बाेलताना उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारी आणि भारताचा तसाच महाराष्ट्राचं स्वाभिमान असणारी भवानी तलाव मोठ्या मनानं ब्रिटिश सरकारनं भारताकडं सोपवली पाहिजे असं म्हटलं.
अफजल खान कबरी (afzal khan tomb) शेजारील काढलेलं अतिक्रमण हे योग्यच असुन राज्य सरकारनं कायद्याचा आधार घेवुन केलेली कारवाई योग्यच असुन या भुमिकेला समर्थन आहे. या कारवाईला राजकीय वळण नकाे अशी भावना राजेंनी (udayanraje bhosale) व्यक्त केली. (Maharashtra News)
प्रतापगडावरील अफजल खान कबर ही लोकांसाठी खुली केली पाहिजे असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले लोकांना आणि युवा पिढीला इतिहास कळावा यासाठी ही कबर लाेकांना पाहण्यासाठी खूली केली पाहिजे. त्याचा राज्य सरकारनं विचार करावा असंही उदयनराजेंनी नमूद केले. (Breaking Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.