Udayanraje Bhosale Saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale Exclusive : साताऱ्यातून उमेदवारी मिळताच उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, दंड थोपटले!

Satara Constituency : भाजपने आजवर राज्यासह देशात विविध विकासकामे केली आहे. केंद्रात आणि राज्यात आता भाजपचं खंबीर सरकार आहे, असं देखील उदयनराजेंनी ठामपणे सांगितलं आहे.

Ruchika Jadhav

मी पहिल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व धर्म समभाव ही संकल्पना राबवली. तोच विचार मनाशी बाळगून गेली ३० वर्षे मी जनतेची सेवा करत आहे. त्यामुळे तरुणांचे आणि सामान्य जनतेचे मला आजवर भरभरून आशिर्वाद मिळालेत, अशा शब्दांत उदयन राजेंनी उमेदवारी जाहीर झाल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उदयन राजे अजित पवार गटातून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू होती. माध्यमांशी संवाद साधताना उदयनराजेंनी यावर देखील प्रतिक्रिया दिलीये. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं साताऱ्यातून मला उमेदवारी मिळणार. त्यामुळे आता कोण काय बोलतं, याचा विचार करू नये. अनेकांना वाटलं की उदयन राजेंनी आपल्या पक्षात यावं आणि निवडणूक लढवावी, त्यांना तसं वाटणं सहाजीकच आहे. मात्र मी माझ्या निर्णयावर ठाम होतो.

राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जास्तीत जास्त राबवले गेलेत. भाजपने आजवर राज्यात देशात विविध विकासकामे केली आहेत. केंद्रात आणि राज्यात आता भाजपचं खंबीर सरकार आहे, असं देखील उदयनराजेंनी ठामपणे सांगितलं आहे.

साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये त्यांचं नाव नव्हतं त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र साताऱ्यातून मलाच उमेदवारी मिळणार असा दाव उदयनराजेंनी अनेक वेळा केला. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली वारी केली. आज अखेर उदयनराजेंचा दावा खरा ठरला असून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule : मोदी सरकारचा मोठा निर्णय, PNG कनेक्शन असेल तर LPG गॅस सिलिंडर बंद

भोंदू खरातकडे मंत्री, अधिकाऱ्यांच्या रागा लागायाच्या; PA हिंगेनं कॅमेऱ्यासमोर सगळं सांगितलं, पाहा नेमकं काय म्हणाला?

Summer Special Cucumber Water Recipe: उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी काकडीचे डिटॉक्स वॉटर कसं बनवायचं?

Maharashtra Live News Update: भोंदू अशोक खरातला फाशी द्या, बीडच्या परळीत सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

Viral video: रस्त्यावर स्टंट करणं पडलं महागात, धावत्या बसने तरुणाला दिली धडक; फुटबॉलसारखा उडून पडला, VIDEO समोर

SCROLL FOR NEXT