Udayanraje Bhosale : शरद पवार साेमवारी साता-यात येणार आहेत? मी बोलण्यापेक्षा सर्वसामान्यांना विचारा असं का म्हणाले उदयनराजे भाेसले

Gudi Padwa 2024 : उदयनराजेंचा आजचा नियाेजित दाैरा हा ग्रामीण भागात आहे. रात्री नऊ वाजता उदयनराजे भाेसले हे सातारा येथे दिपाेत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
udayanraje bhosale criticizes sharad pawar faction lok sabha election 2024
udayanraje bhosale criticizes sharad pawar faction lok sabha election 2024saam tv
Published On

Satara Constituency :

आपल्या रूढी परंपरा जपल्या पाहिजेत असं सांगत खासदार उदयनराजे भाेसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे गुढी (udayanraje bhosale celebrates gudi padwa 2024) उभारल्यानंतर माझ्या विजया पेक्षा लोकांचे हित साध्य झाले पाहिजे असे म्हटले. दरम्यान उदयनराजेंनी राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षात (nationalist congress party sharadchandra pawar) दिवसेंदिवस घट हाेत आहे हे खरं असलं तरी ते मी बाेलण्यापेक्षा सर्वसामान्यांना विचारलं पाहिजे अशी टिप्पणी राजेंनी केली. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

शरद पवार हे 15 तारखेला महविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी सातारा जिल्ह्यात येत आहेत. त्याबाबत खासदार उदयनराजे यांना विचारले असता त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीकेची झोड उठवली.

udayanraje bhosale criticizes sharad pawar faction lok sabha election 2024
Konkan Politics: नारायण राणेंची जय्यत तयारी, उदय सामंतांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा; तिढा वाढला (Video)

उदयनराजे भाेसले म्हणाले प्रत्येकाला आपला पक्ष वाढावा अशी इच्छा असते परंतु आत्ता त्यांचा पक्ष किती वाढतोय मला माहित नाही. उलट घटच होत चालली आहे. एकेकाळी एवढा मोठा असणाऱ्या पक्षाची आजही अवस्था का झाली. या पक्षाची का घट झाली. हे मी बोलण्यापेक्षा सर्वसामान्यांना विचारलं पाहिजे. लोक आता कंटाळली आहेत असेही राजेंनी नमूद केले.

उदयनराजे म्हणाले आतापर्यंत जे मोठे घोटाळे झाले. त्यामुळेच या पक्षाची ही आत्ताची अवस्था झालेली आहे. लोक इडीची भीती घेतात. जेवढे आपण एखादी चूक करतो त्यावेळेस आपल्याला समाजकारणात जायचा अधिकार नसतो. आत्ताच सध्या बाकीच्या पक्षांची जी अवस्था झाली आहे त्याचं कारणच हे आहे असेही उदयनराजेंनी म्हटले.

दरम्यान उदयनराजेंचा आजचा नियाेजित दाैरा हा ग्रामीण भागात आहे. रात्री नऊ वाजता उदयनराजे भाेसले हे सातारा येथील पंचपाळी हाैद, दुर्गामाता मंदिर येथे गुढीपाडवा निमित्त आयाेजिलेल्या दिपाेत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

udayanraje bhosale criticizes sharad pawar faction lok sabha election 2024
Balumama Palkhi Sohala: भंडाऱ्याची उधळण करत 'बाळूमामांच्या नावानं चांगभंल'च्या जयघोषात आदमापुरात पालखी सोहळा संपन्न

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com