udayanraje bhosale & shivendraraje bhosale. satara politics Saam Tv
महाराष्ट्र

Satara Politics: 'त्यांची नेहमीच कुरकूर असते'; उदयनराजेंची शिवेंद्रसिंहराजेंवर टिप्पणी

खऱ्याला मरण नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ करायला आम्ही तयार आहे असे आव्हान उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंनी दिले आहे.

Siddharth Latkar

सातारा : सातारा शहराच्या व शहरवासीयांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सुरु केलेली इनोव्हेटीव्ह सातारा ही योजना, समाजाची आणि समाजहित साध्य करुन घेण्याची चिरकाल चालणारी योजना आहे. ज्या लोकांना इनोव्हेटीव्ह सातारा या शब्दाचा अर्थ आणि शब्दाचे स्पेलिंग अचुक सांगता येणार नाही त्यांनी आमच्या इनोव्हेटीव्ह सातारा (innovative satara) या उपक्रमाविषयी काही बोलु नये असे खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहाजे भाेसले (shivendraraje bhosale) यांचा नामाेल्लेख टाळत टीका केली आहे. (udayanraje bhosale latest marathi news)

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंचा इनोव्हेटीव्ह सातारा हा उपक्रम पालिका निवडणुकीनंतर बासनात जाणार असे साेमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं हाेते. त्यावर उदयनराजेंनी आज त्यास प्रत्युत्तर दिले आहे. (satara politics)

उदयनराजे म्हणतात जनमानसात आमची एक वेगळी छबी आहे. आम्ही सामान्य जनतेकरीताच आजपर्यंत जीवन व्यतीत केले आहे. काहींना आमची धडाडी आणि लोकप्रियता खुपत असते म्हणूनच कथित भ्रष्टाचाराचे मोघम आणि बिनबुडाचे आरोप करणे हा त्यांचा स्थायी भाव बनला आहे. लोकांच्या गतीमान सोयी, सुविधांसाठी कोणत्या योजना राबविणे. लोकहिताची अंमलबजावणी करणे ही जर भ्रष्टाचाराची व्याख्या असेल तर होय.. आम्ही भ्रष्टाचार केला आहे असे उदयनराजे ठामपण म्हटलेत.

स्वार्थ्याध भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सहकाराचा गळा घोटुन स्वाहाकार करुन आता रियल इस्टेटमध्ये घुसलेल्या व्यक्तींनी आजपर्यंत फक्त स्वार्थ पाहिलेला आहे. स्वार्थ नसेल तर त्यांचा कोणताही उपक्रम होत नाही अशा व्यक्तींना निस्वार्थीपणे नागरीकांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्यक्तींची वाढती लोकप्रियता सहन होणारी नाही म्हणून त्यांची नेहमीच कुरकूर असते.

उदयनराजें हे नेहमीच समाजासाठी जगणारी व्यक्ती म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. कुणी कितीही उलट्या बोंबा मारत असले तरी त्या बोंबा मारणा-यांना समाजाने पुरते ओळखले आहे. शाश्वत विकासाच्या गप्पा ठोकणा-यांनी, चालवता आल्या नाहीत म्हणून दोन सहकारी बॅन्कांचे विलिनीकरण केले. तरीही उजळ माथ्याने हिंडणा-यांचा सहकारातील अचंबित करणारा शाश्वत विकास सभासद, नागरीकांनी पाहिला आहे. त्यांचे पोटात एक आणि ओठात एक या वैशिष्ठयाचा अनेकांना बसलेला झटका लोक विसरलेले नाहीत. म्हणून बेछुट, बेताल आरोप करुन, त्यांचा सुरु असलेला चारित्र हननाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही.आम्ही त्यांच्या वक्तव्याला फारशी किंमतही देत नाही असे राजेंनी नमूद केले आहे.

संबधीतांना तरीही आरोप करायचे असतील तर ते त्यांनी पुराव्यानिशी आणि चार-चौघात चर्चेला सामोरे जावून, सिध्द करुन दाखवावेत असे आमचे आव्हान आहे. खऱ्याला मरण नाही हा सूर्य आणि हा जयद्रथ करायला आम्ही तयार आहे असे आव्हान उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंनी दिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

SCROLL FOR NEXT