Sanjay Raut, Satara, chhatrapati shivaji maharaj descendants, udayanraje bhosale, shivendraraje bhosale, shivgarjana yatra saam tv
महाराष्ट्र

Satara : भाजपात उदयनराजेंचा आदर ठेवला जात नाही ? उदयनराजेंनी ठणकावलेच...

खासदार संजय राऊत हे शुक्रवारी सातारा दाै-यावर आले हाेते.

ओंकार कदम

Udayanraje Bhosale : निर्लज्जपणाची हद्द झाली. प्रत्येक वेळी काही नसलं की राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा असा खोचक टोला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला. राहिला प्रश्न आमचा आदर, अनादर करण्याचा... तर कोणाचा घास नाही असेही उदयनराजेंनी टीकाकरांना ठणाकावून सांगितलं.

साता-यातील (Satara) जलमंदिर पॅलेस येथे माध्यमांनी उदयनराजेंना गाठत त्यांना संजय राऊतांविषयी बाेलतं केले. त्यावेळी राजेंनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला.

शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार संजय राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी साता-यातील शाहू कला मंदिर सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संजय राऊतांनी आमदार शिवेंद्रराजे आणि राजघराण्यावर बाेचरी टीका केली. त्याबाबत उदयनराजेंना आज माध्यमांनी छेडले असता उदयनराजेंनी राऊतांना त्यांच्या विधानावरुन सुनावलं.

उदयनराजे म्हणाले विकृत स्वभावामुळे रावतांकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जाते आहे. या विकृतीत वाढत हाेताना दिसत आहे. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून वक्तव्य केलं पाहिजे.

मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही असेही उदयनराजेंनी नमूद केले. संजय राऊत यांची विकृती इथपर्यंत पोहोचली की त्यांनी यापुर्वी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले हाेते. सत्तेत राहण्यासाठी ही विकृत लोक पाहिजे ते बरळतात. त्यांची विधानं राजकीय स्वार्थासाठीची असतात. (Breaking Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

SCROLL FOR NEXT