Udayanraje vs Shivendraraje, Satara, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale, satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan, Sambhajinagar grampanchayat saam tv
महाराष्ट्र

Udayanraje vs Shivendraraje : साता-यात राडा; शिवेंद्रराजेंनतर तेथेच उदयनराजेंनी मारली कुदळ, म्हणाले...

आज सकाळपासून खिंडवाडी परिसरात दाेन्ही राजे आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला आहे.

Siddharth Latkar

Udayanraje Bhosale News : खासदार उदयनराजे भाेसले यांच्या विराेध झुगारुन सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन (satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan) आज (बुधवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (Shivendraraje Bhosale) यांनी खिंडवाडी येथे केले. त्यानंतर आमदार भाेसले हे त्यांच्या नियाेजीत कार्यक्रमास निघून केले. आमदार भाेसले घटनास्थळावरुन जाताच खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी त्याच ठिकाणी विविध विकासकामांचे भूमिपूजन करताच त्यांच्या समर्थकांनी घाेषणाबाजी केली. (Maharashtra News)

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीची जागा माझी आहे असे म्हणत आज खासदार उदयनराजे भाेसले यांनी न्यायालयाचा अवमान हाेऊ नये याची खबरदारी पाेलिसांनी घ्यावी असे आवाहन पाेलिसांना करत खिंडवाडीत भूमिपूजनाच्या ठिकाणी थांबून राहिले. दरम्यानच्या काळात शिवेंद्रसिंहराजे घटनास्थळी पाेहचले. त्यांनी जागा मार्केट कमिटीच्या नावावर असल्याचे सांगत उदयनराजे आणि पाेलिसांच्या उपस्थित कार्यक्रमस्थळी नारळ फाेडत नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा साेहळा पार पाडला आणि निघून गेले.

यानंतर खासदार उदयनराजे भाेसले यांनी घटनास्थळी त्यांच्या समर्थकांसमवेत विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. त्यानंतर उदयनराजे भाेसले म्हणाले संभाजीनगर ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांना विविध विकासकामांसाठी जागा नाही. त्यासाठी त्यांनी आम्हांला या जागेची मागणी केली. आज या जागेत संभाजीनगर ग्रामपंचायतीसाठीच्या विविध विकासकामांसाठीचे भूमिपूजन केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanpur Blast: रस्त्याच्या कडेला उभ्या बाईकमध्ये अचानक मोठा स्फोट, ८ जण गंभीर जखमी; नेमकं काय घडलं?

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई, 34 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, ५ जणांना अटक

SCROLL FOR NEXT