satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan, Sambhajinagar grampanchayat, Udayanraje vs Shivendraraje, Satara, Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale, Satara Breaking News  saam tv
महाराष्ट्र

Satara APMC News : उदयनराजेंना तिथं प्लॉटिंग करायचे आहे...,शिवेंद्रराजेंना संस्थांचे पैसे खाणं अंगवळणी पडलय; राड्यानंतर राजेंचे आराेप-प्रत्याराेप (पाहा व्हिडिओ)

आता दाेन्ही राजेंचा वाद आणखी किती टोकाला पोहोचतो हे पहावे लागेल.

ओंकार कदम

Satara Krushi Utpanna Bazar Samiti News : उदयनराजेंना या जागेवर प्लाॅटींग पाडायचे आहे आणि ती विकायची आहे असा आराेप आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी  (Shivendraraje Bhosale) उदयनराजेंवर केला आहे. तर शिवेंद्रराजे यांना पैसे खाणे येवढं अंग वळणी पडले आहे की त्यांना त्या पुढे दुसरं काही दिसत नाही असे प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale Latest News) यांनी आमदार भाेसलेंना दिले आहे. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या (satara krushi utpanna bazar samiti building bhoomipujan) कार्यक्रमावरुन आज (बुधवार) साता-यात दाेन्ही राजे आणि त्यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. या कार्यक्रमानंतर दाेन्ही राजेंनी साम टीव्हीशी बाेलताना एकमेकांवर आराेप-प्रत्याराेप केले. (Maharashtra News)

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन होणाऱ्या मार्केटवरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे पुन्हा एकदा आमने-सामने आले. सातारा येथील खिंडवाडी परिसरामध्ये साडे पंधरा एकर जागेमध्ये प्रशस्त नवीन सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती होणार आहे. याबाबत आज भूमिपूजन करण्यासाठी आमदार शिवेंद्रराजे यांनी सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रम ठेवला होता परंतु शिवेंद्रराजे तिथे पोहोचायच्या आतच त्या जागी खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे कार्यकर्ते पोचले आणि त्यांनी या जागेच्या ठिकाणी असलेले लोखंडी कंटेनर पोकलेनच्या साह्याने उध्वस्त केला.

उदयनराजे यांनी ही जागा माझ्या मालकीची आहे. या जागेवर दुसऱ्या कुणाला काही करू देणार नाही जर कोणी या जागे राहिले जागेवर आले तर पाय मोडून ठेवीन अशी भूमिका घेतली. उदयनराजे असतानाच थोड्याच वेळात शिवेंद्रराजे या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ठरल्याप्रमाणे भूमिपूजन करून उदयनराजेंच्या समोरच नारळ फोडले व कुदळ देखील मारली.

यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. नंतर त्याच जागेवर खासदार उदयनराजे यांनी देखील भूमिपूजन केले आणि आम्ही या जागेवर या भागातील लोकांसाठी विकास आराखडा तयार करणार अशी भूमिका घेतली.

नेमका वाद काय

सध्याची खिंडवाडी मधील जागा आहे ज्याच्यावरून हा वाद सुरू आहे. ही जागा शासनाने आरक्षित करून सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीला (Satara APMC) दिली आहे. या जागेचे मूळ मालक हे खासदार उदयनराजे आहेत आणि यामध्ये काही कुळे सुद्धा या जागेत आहेत. परंतु ही जागा आरक्षित झाल्यामुळे या जागेवर वरून वाद सुरू झाला. अखेर हा वाद कोर्टात पोहोचला.

शिवेंद्रराजे यांच्या म्हणण्यानुसार सुप्रीम कोर्टाने सुद्धा बाजार समिती साठीच ही जागा आरक्षित ठेवावी अशा प्रकारची सूचना दिली आहे, आदेश दिला आहे. खासदार उदयनराजे यांच्या म्हणण्यानुसार या जागेवर त्यांचा स्वतःचा हक्क आहे आणि माझ्या जागेमध्ये काय करायचे हे मी ठरवणार अशी उदयनराजेंची भूमिका आहे.

शिवेंद्रराजे यांनी आज पोलिसांचा बेकायदेशीर सपोर्ट घेतला आहे. शिवेंद्रराजे काय बोलतात या मध्ये मला काही देणं घेणं नाही. शिवेंद्रराजे यांना पैसे खाणे येवढं अंग वळणी पडले आहे की त्या पुढे दुसर काही दिसत नाही. आतापर्यंत अनेक संस्थांमध्ये भ्रष्टाचार केलेला आहेत असा आरोप देखील या वेळी बोलत असताना उदयनराजे यांनी केला. भविष्यात या जागेवर लोकांच्या साठी नवीन विकास काम उभे करणार या मुद्द्यावर उदयनराजे ठाम राहिले आहेत.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले खासदार उदयनराजे हे महसूल मत्र्यांच्या पासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत सर्वांच्याकडे केस केल्या परंतु याचे सर्वांचे निकाल त्यांच्या विरोधात लागले आहेत. तुमच्याकडे कायदेशीर काही असेल तर आम्हांला दाखवा आणि त्याच्यावर विचार करू. नुसती दादागिरी आणि दडपशाही असलं इथे चालू चालणार नाही.

आम्ही त्यांच्यासमोरच भूमिपूजन करून नारळ देखील फोडलेला आहे. उदयनराजे यांनी स्वतःच्या भ्रमामध्ये राहू नये लोकशाही आहे आणि तस असेल तर हात पाय तोडून दाखवा. या ठिकाणी जमीन मिळाली की प्लॉटिंग करून विकून टाकायचं हा मूळचा हेतू उदयनराजेंचा आहे असा आराेप शिवेंद्रराजेंनी केला.

आमची भूमिका ही शेतकऱ्यांच्या विकासाची आहे आणि त्याप्रमाणेच आज विधीवत भूमिपूजन झालेला आहे. लवकरच या जागेत कामाची सुरुवात होईल आणि छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने मार्केट या जागेत उभे राहील असेही शिवेंद्रराजेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

today horoscope: आज तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

SCROLL FOR NEXT