Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राजकारणात पुन्हा भूकंप होणार? संजय राऊतांनी सांगितला केंद्रबिंदू, महाराष्ट्रात हादरे

Maharashtra political updates: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोस येथे गुंतवणूक आणायला गेले नसून, आमदार फोडाफोडी करण्यासाठी गेले आहेत, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केलाय.

Bhagyashree Kamble

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोस येथे गुंतवणूक आणायला गेले नसून, आमदार फोडाफोडी करण्यासाठी गेले आहेत. सरकारी खर्चातून उदय सामंत दावोसला गेले आहेत. ते तिथे बसून एकनाथ शिंदे यांचे आमदार फोडत असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तसेच उदय सामंत यांचं आता पितळ उघडे पडल्यामुळे ते आता सारवासारव करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उदय सामंत यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. दावोसमध्ये बसून शिवसेनेचे किती आमदार, खासदार भेटले, काँग्रेस पक्षातील किती आणि कोण भेटले, हे सांगण्याची गुंतवणूक करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताबडतोब मुंबईला पाठवायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांच्याकडून दावोस दौऱ्याचा खर्च वसूल करायला हवा. दावोस ही राजकारण करण्याची जागा नसल्याचंही संजय राऊत म्हणाले.

उदय सामंत यांना दिल्लीचा आशीर्वाद आहे. एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना नकोसे झालेत, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नकोसे होतील. भाजपचे अंतरंग मी ओळखले आहेत. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि प्रमोद महाजन होते, तेव्हा आमचे बरे चालले होते. पण गेल्या १० वर्षात दिल्लीत आणि महाराष्ट्रात कटकारस्थान रचण्यात येत होते, असेही संजय राऊत म्हणालेत.

भटकती नाही लटकती आत्मा

पालकमंत्रीपदासाठी रस्त्यावर आंदोलन सुरू आहेत. हा महाराष्ट्राचा कारभार आहे. आयुष्यभर यांनी फोडाफोडी केली. स्वत:ही फुटलेत. हे अस्वस्थ आत्मे आहेत. शरद पवारांनी यांना भटकती आत्मा म्हणाले होते. हे भटकती नाही लटकती आत्मा आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. कुठेतरी समधान मानलं पाहिजे. ईव्हीएमचा आदर करा. ईव्हिएमनं एवढं मोठे बहुमत दिलं आहे. ईव्हिएमच्या माध्यमातून आम्हीही जिंकलोय, कुठेतरी राज्याची प्रतिष्ठा सांभाळा, असंही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT