Uday Samant, Karnataka Maharashtra Border Dispute  Saam Tv
महाराष्ट्र

Karnataka Maharashtra Border Dispute : सीमावादाचा उडणार भडका ? मंत्री म्हणाले, महाराष्ट्राची जनता संयमी !

दोन जमिनी या ठिकाणी आहेत. एक 24 एकर जमीन पिकवणे आणी दुसरी जमीन त्याच्यावर उद्योग नगरी उभारावी किंवा प्रकल्प उभाराव अशा पद्धतीची इथल्या जनतेची मागणी आहे.

विजय पाटील

Karnataka Maharashtra Border Dispute : प्रत्येक एखाद्या वाक्याचा वाईटच अर्थ होत नाही. गुलाबरावांची भूमिका त्या मागची काही वेगळी असेल. दोन्ही राज्यांमध्ये संबंध चांगले राहावेत यासाठी प्रयत्न करत आहे. सीमा भागाचा जो प्रश्न आहे हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. शंभूराज असतील किंवा चंद्रकांतदादा असतील प्रामाणिकपणे सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात असे मंत्री उदय सामंत यांनी नमूद केले.

उद्योग मंत्री उदय सामंत हे आज सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचा (jat taluka) दौऱ्यावर आले आहेत. जत तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि दुष्काळग्रस्तांशी भेटुन ते चर्चा करणार आहेत. सामंत (uday samant) हे श्री दानम्मादेवीचे दर्शन घेऊन जत तालुक्यातील माडग्याळ आणि तिकोंडी येथील दोन तलावाची पाहणी करणार आहेत.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही भूमिका मांडू पण ह्या ज्या काही गोष्टी चालू झालेल्या आहेत कुठे बॅनर कुठे अजून काय करणार हे मला असं वाटतं की दोन्ही राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. महाराष्ट्रातील जनता ही फार संयमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही मुख्यमंत्री याच्यामध्ये चर्चा करतील दोन्ही आमचे मंत्री चर्चा करतील आणि कुठेही राज्यांमध्ये वादळ होणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील.

परंतु महाराष्ट्रमध्ये जी जनता आहे त्यांना जे काय महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित आहे. कारण मला जो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. त्याच्यामध्ये थोडाफार अभ्यास आहे. दोन जमिनी या ठिकाणी आहेत एक 24 एकर जमीन पिकवणे आणी दुसरी जमीन त्याच्यावर उद्योग नगरी उभारावी किंवा प्रकल्प उभाराव अशा पद्धतीची इथल्या जनतेची मागणी आहे.

त्याचा विचार मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलू नक्की करेल वय पडल्यास पुन्हा इथे मला यावं लागलं पंधरा-वीस दिवसांनी आचारसंहिता संपल्यानंतर मी पुन्हा ही परंतु इथल्या जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत यासाठी शिंदे (eknath shinde) फडणवीस सरकारी सकारात्मक आहे वारंवार जरी इथे यावं लागलं त्या लोकांच्या विकासासाठी इथल्या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तरी मी स्वतः इथे भविष्यामध्ये मुख्यमंत्री येतील असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

SCROLL FOR NEXT