Uday Samant
Uday Samant saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Bhushan Award Ceremony: मुख्यमंत्र्यांना कार्यक्रम संध्याकाळी घ्यायचा होता, मात्र...; खारघरमधील दुर्घटनेवर उदय सामंतांचं स्पष्टीकरण

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

Uday Samant On Maharashtra Bhushan Award Ceremony: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी शिंदे आणि भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. एवढ्या उन्हात कार्यक्रम सायंकाळी घ्यायला पाहिजे होता, असं विरोधक म्हणत आहेत. तसेच राजकीय स्वार्थाशिवाय इतके लोक कुणी बोलावतं का?, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशात आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर कार्यक्रमाच्या वेळेबाबत भाष्य केलं आहे. (Political News)

काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. अप्पासाहेब यांना हा पुरस्कार दिला गेला. परंतु दुर्दैवाने उष्माघातामुळे काही जणांनाचा मृत्यू झाला. या घटनेत विरोधक दुर्दैवाने टीका टिपणी करत आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी घ्यायचा होता. आम्ही म्हणत होतो की कार्यक्रम संध्याकाळी घेऊ, मात्र कार्यक्रम संपवून प्रत्येकाला घरी परतता आले पाहिजे म्हणून हा कार्यक्रम दुपारी ठेवला, असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांना संध्याकाळी कार्यक्रम घ्यायचा होता. श्री सदस्यांनी विनंती केली की, आम्हाला घरी जायला उशीर होईल. त्यामुळे कार्यक्रम सकाळी घेतला, असं उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

रेल्वे स्टेशनमधून यायला आणि जायला 21 ठिकाणी पार्किंग दिली होती. जास्तीत जास्त सुविधा द्यायचा प्रयत्न आम्ही केला. परंतु वातावरण बदलले आणि तापमान वाढले. श्री सदस्यांना अप्पासाहेबांना पाहायचे होते. श्रद्धेचा विषय होता त्यामुळे कोणाला अडवणे योग्य नव्हते, असंही उदय सामंत म्हणाले.

पुढे याविषयी बोलताना त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी स्वतः याचा आढावा घेतला होता. मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये घोषित केले आहेत. खर्च किती झाला ते आम्ही जाहीर करू.

पुढे विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना उदय सामंत यांनी म्हटलं की, ही वेळ प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायची नाही. राज ठाकरे यांनी सूचना केल्या आहेत. पण काही जणांनी याचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला. काहीतरी आपल्याला सापडले आहे आणि या अविरभावातून कोणीही सरकारवर टीका करू नये, असं उदय सामंत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramda Athawale on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे तुमचे नखरे, रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी

Shiv Sena UBT: मुलुंडप्रकरण तापलं! ठाकरे गटाच्या 5 जणांना अटक, नेमका ठपका काय?

Periods Tips: मासिक पाळी दरम्यान या चुका करू नका, नाहीतर...

Today's Marathi News Live: महायुतीने सावरकरांच्या नावावर केवळ राजकारण केलं; अरविंद सावंत

Ramdas Athawale : मविआला देत आहोत अशी टक्कर की, नेत्यांना आली पाहिजे चक्कर; आठवलेंचा चारोळीतून विरोधकांना भन्नाट टोला

SCROLL FOR NEXT