Nashik
Nashik Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले, तोल जाऊन थेट 110 फूट खाली कोसळले, दोन तरुणांचा दुर्दैवी अंत

अभिजीत सोनावणे

नाशिक : मनमाडजवळील हडबीची शेंडी, थमसप म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी आलेले दोन तरुण तोल जाऊन सुमारे 110 फूट खाली पडले. या दुर्घटनेत दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर यातील एक तरुण जखमी झाला असून इतर 12 जण सुखरूप आहेत. रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवले (Two youths who went for trekking on Shendi hill fell 110 feet and died in Nashik).

नेमकं काय घडलं?

अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या वतीने हडबीची शेंडी (Shendi) या सुळक्यावर आरोहण मोहिमेचं 2 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले होते. 18 जण यात सहभागी झाले होते. त्यात काही मुलींचाही सहभाग होता.

दुपारपर्यंत सर्व सहभागींचे यशस्वी आरोहण झाल्यानंतर सर्व सहभागींना खालच्या टप्प्यावर उतरवण्यात आलं. शेवटचे तिघे जण उतरण्याच्या बेतात असताना त्यातील दोघे थेट 110 फूट खाली कोसळले. यात त्यांचा मृत्यू (Death) झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या अपघाताची माहिती मिळताच कातरवाडी येथील ग्रामस्थांनी हडबीची शेंडीवर धाव घेऊन बचावकार्य (Rescue Operation) सुरु केले. ग्रामस्थांनीच राबवलेल्या या बचावकार्यात सर्व सहभागींना संध्याकाळी उशिरापर्यंत खाली आणण्यात आले होते.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

Nawazuddin Siddiqui Net Worth : एकेकाळी वॉचमॅनची नोकरी करणारा नवाज आज आहे कोट्यवधींचा मालक

Chhagan Bhujabal News | मविआचा 35 जागांचा दावा भुजबळांनी असा खोडून काढला..

Delhi Metro: पुन्हा दिल्ली मेट्रोचा व्हिडिओ व्हायरल; लेडीज कोचमध्ये मुलीचा अश्लील डान्स Watch video

Shakuntala Railways | अबब! चोरट्यांनी थेट रेल्वे ट्रॅकच पळवला!

SCROLL FOR NEXT