Accident: कारचा विचित्र अपघात; सहाजण जखमी

कारचा विचित्र अपघात; सहाजण जखमी
Accident
Accidentsaam tv

धुळे : शहरातील देवपूर भागातील वाडीभोकर रोडवर सायंकाळी कारचा विचित्र अपघात झाला. अचानक ब्रेक फेल झाल्याने भरधाव कार थेट जिल्हा क्रिडा संकुलाच्या तळमल्यातील दाबेली सेंटरवर जावून धडकली. त्यात कारमधील चौघे तर दाबेली खाणारे दोघे असे सहा जण गंभीर जखमी झाले. नागरिकांनी मदत कार्य करत जखमींना तत्काळ जवळील रूग्णालयात दाखल केले. (dhule news Bizarre car accident Six injured)

कारचे ब्रेक फेल झाल्यामुळे कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या अपघाताची माहिती मिळताच पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या साहाय्याने या कारला बाहेर काढण्यात आले. कारचा ब्रेक फेल होऊन झालेल्या विचित्र अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com