two youth passes away in a road accident near mahableshwar saam tv
महाराष्ट्र

शिवराज्याभिषेक साेहळ्यास गेलेल्या २ तरुणांचा अपघाती मृत्यू, मंगळवेढ्यासह महाबळेश्वरावर शोककळा

रविवारी रात्रीच्या सुमारास झाला हाेता अपघात.

साम ब्युरो

सातारा : महाबळेश्वर (mahableshwar) शहरापासून एक किलाे मीटर अंतरावर रविवारी रात्रीच्या सुमारास हॉटेल अप्सरा ते महाड नाका (mahad naka) परिसरातील वळणावर तीन दुचाकींच्या झालेल्या अपघातात दाेन युवक (youth) जागीच ठार झाले आहेत. या अपघातात दोन युवक जखमी झाले आहेत. हे युवक किल्ले रायगड येथे शिवराज्यभिषेक (shivrajyabhishek din) साेहळ्यासाठी (shivrajyabhishek sohala) गेले हाेते अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. (mahableshwar accident latest marathi news)

या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी : महाड नाका परिसरात एक दुचाकी भरधाव वेगात विरुद्ध दिशेने निघाली होती. या दुचाकीची धडक समोरून येणाऱ्या मोटार सायकल व आणखी एका दुचाकीशी झाली. त्यावेळी माेठा आवाज झाला.

या अपघातात जुबेर मुस्तफा मानकर (महाबळेश्वर) (satara), आकाश तानाजी भोसले (मंगळवेढा ता.पंढरपुर) हे दाेघे जागीच ठार झाले. तसेच अमिन बिस्मिल्ला शेख (महाबळेश्वर) व दरिबा सुनिल बळवंतराय उर्फ गोट्या (मंगळवेढा) (mangalvedha) हे जखमी झाले आहेत. या दाेन्ही युवकांवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

Edited : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आभाळाएवढं दु:ख बाजूला ठेवून शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; नीरा नदीच्या काठावर केली दूषित पाण्याची पाहणी|VIDEO

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र अव्वल; गणेशोत्सव चित्ररथाने मिळवला सर्वोच्च बहुमान

SCROLL FOR NEXT