two youth died three injured in a road accident at kass road near satara saam tv
महाराष्ट्र

Satara Accident : कास पठाराहून साताऱ्याकडे जाणाऱ्या कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

Kass Road : पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार कास पठाराहून सातारा शहराकडे जात असताना एका कारचा अपघात झाल्याचे ग्रामस्थांना पाेलिस ठाण्यात कळविले.

ओंकार कदम

Satara :

सातारा शहरानजीकच्या कास पठारकडे (kaas plateau) जाणा-या रस्त्यावर आज (साेमवार) सकाळच्या सुमारास झालेल्या अपघातात दाेन जण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सातारा तालुका पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनूसार कास पठाराहून सातारा शहराकडे जात असताना एका कारचा अपघात झाल्याचे ग्रामस्थांना पाेलिस ठाण्यात कळविले. अपघातग्रस्त कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. संबंधित कार रस्त्यालगत असणाऱ्या सुरक्षा कठड्याला धडकली. त्यामुळे कारचे माेठं नुकसान झाले आहे.

या अपघातात दाेघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तसेच तिघे जण गंभीर जखमी झालेत. सातारा शहरातून काहींनी रुग्णवाहिका आणून जखमींना रुग्णालयात नेले. दरम्यान अपघाताची माहिती कळताच अपघातग्रस्त व्यक्तींचे परिचित तसेच नातेवाईक घटनास्थळाचे चित्र पाहताच त्यांनी आक्राेश केला. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT