Gadchiroli News Saam Tv
महाराष्ट्र

Leopard Attack : धक्कादायक! सरपणासाठी गेल्या परत आल्याचं नाहीत, बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू

Gadchiroli Leopard Attack News : गडचिरोलीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. सरपण गोळा करताना या महिलांवर हल्ला झाल्याची माहिती असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Alisha Khedekar

  • गडचिरोलीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू

  • दोघी जंगलात सरपण गोळा करताना मृत्यूमुखी

  • गावात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक आक्रमक

  • बिबट्याच्या शोधासाठी वनविभाग आणि पोलीस सतर्क

गडचिरोलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात काम करणाऱ्या दोन महिलांवर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले असून गावकऱ्यांकडून वारंवार बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. दरम्यान मृत झालेल्या महिलांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही गडचिरोलीतील देऊळगाव बुट्टी (आरमोरी) येथे घडली आहे. १९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास सरपण गोळा करण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या दोन महिलांना वेगवेगळ्या दिवशी बिबट्याने हल्ला करून ठार केले. या घटनेत दोघींचा मृत्यू झाला आहे.

मुक्ताबाई नेवारे (वय, ७०) सरस्वती जिंदर वाघ (वय ८०) अशी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. मुक्ताबाई नेवारे ह्या सकाळी गावापासून अर्धा किमी अंतरावरील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता बिबट्याने त्यांना ठार केले, तर अनुसया जिंदर वाघ ह्या १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. अशातच गडचिरोली- आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडीलगत मृत प्राण्यांचा उग्रवास येत होता.

गावातील नागरिकांनी शोधमोहीम राबवली असता रात्री ८ वाजेच्या सुमारास अनुसूया जिंदर वाघ यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत आहे. तर परिसरातच मुक्ताबाई नेवारे या सुद्धा मृतावस्थेत आढळल्या. या घटनेची माहिती देऊळगावचे पोलिस पाटील मिथून कांदोळ यांनी आरमोरी पोलिसांना दिली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आला.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मागिल ८ ते १० दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर देऊळगाव परिसरात दिसून येत होता व बिबट्याने गावातून काही कोंबड्यांना सुद्धा फर्स्ट केले होते अशी माहिती गावकऱ्यांनी दिलेली आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

का रे दुरावा! फडणवीस-शिंदेंनी एकमेंकाशी बोलणं टाळलं, राजकीय वर्तुळात चर्चांना जोर, पाहा व्हिडिओ

Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा लग्न सोहळा धुमधडाक्यात, नवरदेव पलाश मुच्छल सांगलीत दाखल

अमराठी महापौर दिलात तर रस्त्यावर उतरु! सर्व पक्षांना कोणी दिला इशारा? VIDEO

Maharashtra Live News Update : मालेगावात घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरमधील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! e-KYC बाबत शासनाचा मोठा निर्णय, अदिती तटकरेंचं ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT