Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! आंघोळीसाठी ३ मित्र नदीत उतरले अन् अनर्थ घडला; दोघे पाण्यात बुडाले

Wardha News In Marathi : वर्धा येथील ३ मित्रांना आंघोळीसाठी उतरणे महगात पडले आहे. या ३ मित्रापैकी २ जण नदीत बुडाले आहे. या घटनेनंतर मित्रांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

चेतन व्यास, साम टीव्ही प्रतिनिधी

वर्धा : स्वातंत्र्य दिनानिमित्त कामाला सुट्टी असल्याने आठ मित्र वर्धा येथील पवनारच्या धाम नदी पात्रात फिरायला गेले. यापैकी तिघे पाण्यात अंघोळीसाठी उतरले. यातील दोघे पाण्यात बुडाल्याची घटना घडली. तर एक बचावला आहे. पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दोघांचा नदीपात्रात शोध सुरु आहे. जुमाय खान (वय 21वर्ष ) व नासीर खान(वय 21 वर्ष ) अशी बुडालेल्या दोघांची नाव आहे.

उत्तरप्रदेशमधून वर्ध्यात पीओपीच काम करण्यासाठी काही मजूर आले आहेत. ते वर्ध्यात कारला चौकात सध्या भाड्याच्या खोलीत राहत आहेत. ते पीओचे काम करत होते. आज कामाला सुट्टी असल्याने ८ सहकारी पवनारच्या धाम नदी परिसरात फिरायला गेले. यापैकी जुमाय खान, नासीर खान व रेहान खान हे तिघे नदीपात्रात आंघोळीला गेले. यापैकी जुमाय खान आणि नासिर खान हे पाण्यात बुडाले आहे. ते नदीपात्रात वाहून गेले तर रेहान खान हा थोडक्यात बचावला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनसह आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बुडालेल्या दोघांचा नदीपात्रात सध्या शोध घेतला जात आहे.

सततच्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पवनार येथे अनेक लोक पर्यटनकरिता येत आहे. खोल पाण्यात जातं आहे. नागरिकांची ही हौस त्यांच्या अंगलट येताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी नदी काठावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Aditya Rajyog: मंगळादित्य राजयोग सक्रिय होताच पालटणार नशीब; धन, दौलत अन् प्रसिद्ध सर्व काही मिळेल

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

SCROLL FOR NEXT