Patan Accident Saam Tv
महाराष्ट्र

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; 3 जण जागीच ठार, दोघे गंभीर

Patan Accident : अपघातप्रकरणी मृत नितीन बबन तिकुडवे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे

ओंकार कदम

सातारा : पाटण (Patan) तालुक्यातील नावरस्ता ढेबेवाडी मार्गावर एक भीषण अपघात झाला. दुचाकीवर असलेल्या काका-पुतण्याला समोरून येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. या धडकेत समोरील दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर काका पुण्यात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मावळली. (Satara Patan Bikes Accident)

भारत पाटील आणि बबन पडवळ असं काका-पुतण्याचं तर, नितीन बबन तिकुवडे असं मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथील नितीन तिकुडवे व अनिकेत पाटील हे दोघेजण रविवारी रात्री दुचाकीवरून नवारस्ताहून मरळीच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते.

त्याचवेळी भरत पाटील, बबन पडवळ व संकेत शिंदे हे तिघेजण मरळीहून नवारस्त्याच्या दिशेने येत होते. नाडे-नवारस्ता गावच्या हद्दीत सांगवड पुलाजवळ दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्या. त्यावेळी नितीन तिकुडवे याचा दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याच्या दुचाकीची जोराची धडक बसली.

ही धडक एवढी भीषण होती की दोन दुचाकीवरील पाच जण रस्त्यावर फेकले गेले. अपघातात सर्वांना गंभीर दुखापत झाली. परिसरातील ग्रामस्थांनी जखमींना कऱ्हाडला रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या दोघांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. हवालदार कांबळे यांनी याबाबतची फिर्याद पाटण पोलीस ठाण्यात दिली असून, अपघातप्रकरणी मृत नितीन बबन तिकुडवे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'मुळशी पॅटर्न'फेम अभिनेत्याला खडसावलं! नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT